[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rules Changing From 1 June 2023: आजपासून नवा महिना सुरू होत आहे. अशातच जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींत बदल करतात. यासोबतच पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही बदलल्या जाऊ शकतात. यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून बदलणार असलेल्या नियमांबद्दल…

1. गॅस सिलेंडर, CNG आणि PNG च्या किमतींत बदल

तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी (LPG), सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती बदलतात. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर एप्रिल आणि मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. जूनमध्ये तेल कंपन्या गॅसच्या किमतींत काही बदल करू शकतात.

2. 100 दिवस 100 पेमेंट मोहीमेला सुरुवात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केली आहे. याद्वारे RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

3. इलेक्ट्रिक टू व्हीलर महागणार

जर तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसणार आहे. 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती की, सरकार आता या वाहनांवरील अनुदान कमी करणार आहे. यापूर्वी या वाहनांवर 15,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान उपलब्ध होतं, ते आता 10,000 रुपये करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, जून 2023 पासून, या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च 25,000 ते 30,000 रुपयांनी महाग होणार आहे.

LPG Gas Cylinder Price: LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, पाहा Latest Rates

LPG Cylinder Price Reduce: एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.

नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे.

[ad_2]