[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune BJP Congress News : पुणे कॉंग्रेस आणि पुणे भाजपमधील विकास कामांवरुन असलेला वाद चिघळला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयात जाण्याासाठी पोलिसांनी थांबवलं आहे. त्यांना कॉंग्रेस भवनमध्येच थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पुण्यातील विकास कामांवरून पुणे कॉंग्रेस आणि पुणे भाजपमधे ट्विटर वॉर सुरु आहे. पुणे भाजपने मागील पाच वर्षांत महापालिकेचा कारभार हाती असताना पुण्याचा विकास केला नाही, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. या आरोपाला उत्तर देताना भाजपकडून पुण्यातील कॉंग्रेसच पक्ष कार्यालय असलेल्या कॉंग्रेस भवनचा फोटो वापरुन कॉंग्रेसने फक्त स्वतःच पक्ष कार्यालय राजवाड्यासारखं बांधलं, पुणेकरांसाठी काही केलं नाही, असा पलटवार करण्यात आला. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे.
त्यानंतर पुण्यातील कॉंग्रेस भवन हे स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेसच्या नेत्यांनी वर्गणी काढून बांधले असून काकासाहेब गाडगीळ यांनी त्यासाठी पत्नीचे दागिने विकले होते. त्यामुळे भाजपचा आरोप चुकीचा असल्याचा दावा कॉंग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. पुणे भाजपच्या नेत्यांना कॉंग्रेस भवनचा इतिहास समजावा यासीठी कॉंग्रेस भवनच्या इतिहासाचा समावेश असलेली पुस्तिका भाजपच्या नेत्यांना देण्यासाठी भाजपच्या पक्ष कार्यालयात जाणार असल्याच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पुण्यातील कॉंग्रेस भवनमधेच थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भाजपने पुण्यात काय केलं?; ट्विट चर्चेत
कॉंग्रेसनं पुण्यात काय केलं? असं म्हणत पुण्यातील भाजपच्या ट्विटरवर कॉंग्रेसभवनाचा फोटो टाकण्यात आला आहे. तर भाजपने काय केलं? असं म्हणत नदी सुधार प्रकल्प, पुणे मेट्रो, इलेक्ट्रिक बस, चांदणी चौक प्रकल्प आणि बरंच काही, असं लिहिण्यात आलं आहे. भाजपाने राष्ट्र प्रथम भुमिका ठेवत पुण्याच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देत कायापालट केला, असंदेखील ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे. याच ट्विटवरुन या वादाला तोंड फुटलं आहे.
कॉंग्रेसनं पुण्यात काय केलं?
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी हे ट्विट रिट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘निर्ल्लजांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो
1942 च्या चलेजाव आंदोलनात काँग्रेसभवनमध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी नारायण दाभाडे हा युवक हुतात्मा झाला. हातात तिरंगा घेऊन भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान ज्या हुतात्मा नारायण दाभाडे यांनी ज्या ठिकाणी दिले ती ही पवित्र वास्तू आहे. अश्या वास्तूला राजवाडा म्हणताना तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला हवी.. आणि तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जीनीं ब्रिटिशांना पत्र लिहून 1942 चे चले जाव आंदोलन चिरडून टाकण्याची विनंती केली होती. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीचाही संबंध नाही अश्यांनी काँग्रेस भवनसारख्या ऐतिहासिक वास्तूचा पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
निर्ल्लजांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो
1942 च्या चलेजाव आंदोलनात काँग्रेसभवनमध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी नारायण दाभाडे हा युवक हुतात्मा झाला. हातात तिरंगा घेऊन भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान ज्या हुतात्मा नारायण दाभाडे यांनी ज्या ठिकाणी दिले ती ही पवित्र… https://t.co/LCgi3yfU8H
— Chaitanya Purandare (@Chaitanya_INC) May 31, 2023
[ad_2]