Beed Maharashtra After Setted MLA Prakash Solanke From Ajit Pawar Group House On Fire His Brother Dhairyashil Solanke House Also Setted On Fire Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड : माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या माजलगाव शहरातील बंगल्याच्या आवारात मराठा आंदोलकांनी गाड्या जाळल्या. त्यानंतर आता त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात देखील मराठा आंदोलकांकडून (Maratha Reservation) जाळपोळ करण्यात आलीये. यावेळी जमावाने त्यांच्या घरातील साहित्य देखील बाहेर काढून रस्त्यावर जाळले. दरम्यान यामुळे आता बीडमधील (Beed) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान बीडमध्ये अशा अनेक घटना आज दिवसभरात घडल्या. त्याच पार्श्वभूमीवर सध्या बीडमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आलीये. प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा समाजाने दगडफेक देखील केली. त्यानंतर बीडमधील परिस्थिती अधिकच तीव्र होत गेली. त्यानंतर अनेक आमदांच्या घराच्या परिसरात जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे. 

बीडमधील परिस्थिती चिघळली

बीडमधील परिस्थिती सध्या जास्त भयावह होत चालल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न सराकरकडून करण्यात येतातय. त्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. अनिश्चित काळासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशाने लागू झाले आहे. बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. 

ठिकठिकाणी रास्ता रोको

दरम्यान बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं.  बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाज आंदोलन करत असून, रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या बंगलाही जमावाने बीडमध्ये आग लावली..

माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव शहरातील बंगला आग लावल्यानंतर प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या बीड शहरातील बंगलाही आंदोलकांनी आग लावली.. यावेळी जमावाने सोळुंके यांच्या घरातील साहित्य बाहेर काढून ते रस्त्यावरती जाळले. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीचा आदेश लागू, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

[ad_2]

Related posts