Lic To Eases Claim Process Settlements Norms For Odisha Train Accident Victims 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे एलआयसी ऑफ इंडियाकडून पत्रक काढत दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. ओडिशा रेल्वे अपघातातील बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्लेम सेटलमेंट्सचा त्वरीत निपटारा करत आर्थिक मदत देण्याचं आश्वासन या पत्राच्या माध्यमातून एलआयसीने दिलं आहे. 

एसआयसी अध्यक्षांकडून पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत मृत प्रमाणपत्रांच्या बदल्यात रेल्वे, पोलिस, राज्य किंवा केंद्राने प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. सोबतच एलआयसीकडून क्लेम सेटलमेंट्ससाठी शाखा स्तरावर मदत केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याचं या पत्रातून सांगितलं आहे.

 

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे अपघात झाला. येथे कोरोमंडल एक्स्प्रेस (12841) आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कोरोमंडल एक्स्प्रेसच्या 15 बोगी रुळावरून घसरल्या. एक्सप्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील शालीमारहून चेन्नई सेंट्रलला जात होती. 250 किमी गेल्यानंतर ट्रेनला अपघात झाला.

आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात

34 महिन्यांनंतर देशात पुन्हा एकदा एक रेल्वे अपघात झाला आहे, ज्यामध्ये तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 22 मार्च 2019 रोजी रेल्वे अपघात झाला होता. 12 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली होती. 

शुक्रवारी झालेला ओडिशा येथील रेल्वे अपघात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक आहे. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 900 जण जखमी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  

 



[ad_2]

Related posts