[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maharashtra Anti-Bribery Department: राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालाय. ५ कोटी ८५ लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालाय. किरण लोहारची पत्नी सुजाता आणि मुलगा निखिलवरही गुन्हा दाखल झालाय. बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी सहाय्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. १९९३ ते २०२२ या काळात सरकारी सेवेत असताना किरण लोहारने घबाड जमवण्याला आरोप आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत गेल्यावर्षी २५ हजारांची लाच घेताना मागच्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर किरण लोहारची चौकशी सुरू होती. </p>
[ad_2]