Agriculture News News Eighth Pass Farmer Successful Experiment In Banana Farming Uttar Pradesh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agriculture News : केळी (Banana) हे जगातील सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ आहे. भारतात (India) केळीची सर्वाधिक लागवड तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकात केली जाते. आता उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या भागात केळीची लागवड सुरु झाली आहे. बाराबंकी (Barabanki) येथील आठवी पास शेतकरी राम शरण वर्मा (Ram Saran Verma) यांनी केळी शेतीच्या प्रसारात सर्वात मोठे योगदान दिले आहे. गेल्या 32 वर्षांपासून ते केळीची शेती करत आहेत. त्यांनी बाराबंकी जिल्ह्यात केळीची लागवड केली आहे. त्यानंतर एक मॉडेल विकसित केले आहे, याद्वारे आज उत्तर प्रदेशमध्ये एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे. 2019 मध्ये, त्यांना भारत सरकारने शेतीतील नवनवीन प्रयोगांमध्ये योगदान दिल्याबद्दल आणि केळीच्या शेतीतून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

अशा प्रकारे केळी शेतीची सुरुवात 

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शेतकरी राम शरण वर्मा हे केळी संशोधनासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि बंगळुरु येथे गेले आहेत. अनेक ठिकाणी आलेल्या अनुभवातून मी शिकल्याचे त्यांनी सांगितले. आपण 100 ते 125 एकर जमिनीवर केळीची लागवड केली आहे. आज आपल्या राज्यात एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर सर्वेक्षण केल्यावर समजले की, सर्व केळी शेतकरी श्रीमंत आहेत. केळी पिकवण्यासाठी शेतकऱ्याला वर्षभर मेहनत करावी लागत नाही.  केळीच्या लागवडीसाठी कधीच बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्याला केळीची बाजारपेठ उपलब्ध आहे.

केळीपासून 30 हजार शेतकऱ्यांना रोजगार 

राम शरण वर्मा म्हणाले की, आम्हाला खूप आनंद होत आहे की आज आमच्यामुळं लाखो हेक्टरवर शेती केली जात आहे. हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. त्यातून हजारो रोजगार मिळत आहे. आज आम्ही 30000 हून अधिक लोकांना काम देत असल्याचे शर्म म्हणाले. 

केळीची लागवड कशी करावी

उत्तर प्रदेशात केळी लागवडीसाठी 15 जून ते 15 जुलै हा काळ सर्वात योग्य मानला जातो. हे पीक सप्टेंबरमध्ये तयार होते. काढणीचा कालावधी हा 12 ते 14 महिन्यांचा असतो. केळीची लागवड ऑगस्टमध्ये किंवा निर्धारित वेळेपूर्वी करू नये, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. यामुळं उत्पादनात 10 ते 15 टक्के घट होते. एका झाडापासून दुसऱ्या रोपातील अंतर 6 फूट ठेवावे. त्यानुसार एका एकरात 1200 झाडे लावली आहेत. काही शेतकरी एका एकरात 1500 पर्यंत रोपे लावतात. परंतू, यामुळं अंतर कमी होते. उत्पादनावर परिणाम होतो. केळीचा G-9 प्रकार सर्वात योग्य मानला जातो. त्याची टिश्यू कल्चर रोपे प्रयोगशाळेत तयार केली जातात आणि रोग प्रतिरोधक असतात.

केळी लागवडीसाठी मातीची निवड

केळी मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले शेतकरी राम शरण वर्मा म्हणाले की, वालुकामय चिकणमाती केळी लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. केळी लागवडीसाठी जमिनीचा pH 6.5 ते 7 गुणांच्या दरम्यान असावा. केळी लागवडीसाठी शेतात पाण्याचा निचरा होणारी माती निवडावी. केळीला पाण्याची अ‍ॅलर्जी असते, त्यामुळे पाणी भरून केळीची लागवड करू नये. केळीसाठी नापीक जमीन नसावी. केळीचे रोप लावण्यापूर्वी शेणखत शेतात वापरावे. त्यामुळे केळीचे चांगले पीक आले आहे. केळीची लागवड नेहमी कड्यावर करावी. केळीला जास्त सिंचनाची गरज नसते पण ओलावा लागतो.

एक एकरात 4 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 

एका एकरात 1200 केळीची रोपे लावल्यास 350 ते 400 क्विंटल केळीचे उत्पादन मिळते. केळी 10 रुपये किलो दराने विकली तरी एक एकरात 4 लाख रुपयांपर्यंतचे पीक नक्कीच मिळत असल्याची माहिती  शेतकरी राम शरण वर्मा म्हणाले. तर पीक खर्च केवळ 20 ते 25 टक्के आहे. अशा प्रकारे केळीची लागवड करुन शेतकऱ्याला एकरी तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळतो. शेतकऱ्यांना केळीच्या लागवडीसाठी बाजारपेठ शोधण्याचीही गरज नाही, उलट जवळच्या बाजारपेठेत केळी सहज विकली जातात.

महत्त्वाच्या बातम्या:

जर्मनीतील भरभक्कम पगाराची नोकरी सोडली, आता करतोय वाटाणा शेती; वर्षाला कमावतोय 5 कोटी

[ad_2]

Related posts