पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – मोईल येथे ३० लाखांची घरफोडी केलेल्या एका चोरट्याला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दुचाकीच्या चाकावरून पोलिसांनी अटक केली.आमीर शब्बीर शेख (वय २५, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई येथे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वाजताच्या कालावधीत घरफोडी झाली होती. याप्रकरणी नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून ४७.८ तोळे सोने आणि ५ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३० लाख ४८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. त्या दुचाकीचे चाक लाल रंगाचे होते. त्यानंतर मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालताना पोलिसांना संशयित दुचाकी दिसली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आमीर शेख याच्याकडून ४७.८ तोळे सोन्याचे दागिने, तीन लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी जप्त केले आहे.
Related posts
-
धम्मराज साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती .
एम आय एम पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता मा.धम्मराज साळवे यांनी आपल्या... -
चिखली भागातील गुंडा पुंडांना कोणाचा आशीर्वाद?
– अजित गव्हाणे यांच्यासमोर नागरिकांनी मांडली मनातील खदखद भोसरी 20 ऑगस्ट (pragatbharat.com) : चिखली या भागातील मोरेवस्ती,... -
नाना काटे यंदा आमदार होणारच – पार्थ पवार , नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
चिंचवड, १६ ऑगस्ट :चिंचवडमधून आम्ही विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नाना...