पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दारूच्या नशेत एकाने मित्राच्या पोटावर दगडाने मारल्याने तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. चिंचवड, शाहूनगर येथील शाहू उद्यानात मंगळवारी (दि. २) ही घटना घडली.सचिन अशोक जगताप असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन यांच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण कैलास पवार (वय ३३, रा. स्पाईन रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सचिन जगताप आणि आरोपी भूषण पवार हे मित्र आहेत. ते मंगळवारी दुपारी शाहूनगर येथील शाहू उद्यानात बसले होते. तिथे त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. दारूच्या नशेत भूषण याने सचिन यांच्या पोटावर दगड मारला. त्यामध्ये सचिन यांच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. या घटनेत सचिन हे गंभीर जखमी झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आ
Related posts
-
मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन
पिंपरी, पुणे ( pragatbhara.comदि. ८ मे २०२४) मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.... -
रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या – डॉ. सदानंद मोरे
श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तुत्व संपन्न व्यक्ती, संस्थांचा गौरव पिंपरी (Pclive7.com):- ज्या लोक प्रतिनिधींकडून सर्वसामान्य... -
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने गौरव; राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून सन्मान
पिंपरी (pragatbharat.com):– लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी...