पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – आई आणि दोन बहिणींना काठीने मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी सांगवी येथे ३० व ३१ डिसेंबर २०२३ रोजी ही घटना घडली.निलेश रतन वंजारे आणि त्याची पत्नी (दोघे रा. संत तुकाराम नगर, नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि सुनेने त्यांच्याशी वाद घालत हाताने मारहाण केली. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांच्या दोन मुली फिर्यादी यांना बघण्यासाठी आल्या. आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करून फिर्यादी आणि त्यांच्या मुलींना काठीने मारहाण केली. तसेच तुमचा काय संबंध इथं यायचा. तुम्हाला जिवे मारीन, अशी धमकी दिली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.
Related posts
-
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार
पिंपरी(pragatbharat.com) दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट, दर्जेदार, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवला... -
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी :(pragatbharat)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी पिंपरी... -
धर्मनिरपेक्षता कृतीतून व्यक्त करा : डॉ. राजेंद्र कांकरिया
चिंचवड ता २७ :(pragatbharat.com) चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांची प्रेरणा व बी.एड....