[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Most Powerful Passport 2024 : भारतीय पासपोर्टच्या मूल्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारतीय पासपोर्टने तीन स्थानांनी सुधारणा करत 80 वे स्थान पटकावले आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये याची माहिती देण्यात आली आहे. याचा अर्थ भारताचा पासपोर्ट हा जगातील 80 वा शक्तीशाली पासपोर्ट आहे.
62 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश
नुकत्याच जाहीर झालेल्या हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या रँकिंगनुसार, भारतीय पासपोर्ट उझबेकिस्तानसह 80 व्या क्रमांकावर आहे. आता भारतातील लोकांना 62 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळू शकतो. या देशांमध्ये भूतान, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशिया आदींचा समावेश आहे.
या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल
असे अनेक देश आहेत जिथे भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळत आहे. व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा असलेल्या देशांमध्ये कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, म्यानमार, तैमूर-लेस्टे, इराण, बोलिव्हिया, बुरुंडी, केप वर्दे बेटे, कोमोरो बेटे, जिबूती, गॅबॉन, मादागास्कर, सेशेल्स, मॉरिशस, मोझांबिक, सिएरा लिओन, सोमालिया, टांझानिया आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
भारतानंतर या देशांचा क्रमांक
यापूर्वी 2023 मध्ये भारतीय पासपोर्टची रँकिंग 83 होती. आता 2024 मध्ये भारतानंतर भूतान, इजिप्त, जॉर्डन, व्हिएतनाम, म्यानमार, अंगोला, मंगोलिया, मोझांबिक, ताजिकिस्तान, मादागास्कर, बुर्किना फासो, कोटे डी’आयव्होरी, इक्वेटोरियल गिनी, सेनेगल, अल्जेरिया, कंबोडिया आणि माली या देशांचा समावेश आहे.
या देशांच्या पासपोर्टला विशेष महत्त्व
सर्वात शक्तिशाली पासपोर्टबद्दल बोलायचे झाले तर फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचा क्रमांक वरचा आहे. या देशांतील लोक व्हिसाशिवाय 194 देशांना भेट देऊ शकतात. त्यांच्यापाठोपाठ फिनलंड, स्वीडन आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो ज्यात 193 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश आहे. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्सचे पासपोर्ट 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशासह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पाकिस्तानी पासपोर्टचा कितवा क्रमांक
कमी रँकिंग असलेल्या देशांच्या यादीत डोमिनिका, हैती, मायक्रोनेशिया, कतार, सेंट व्हिन्सेंट, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वानुआतु यांचा समावेश आहे. शेजारी देश पाकिस्तानचा पासपोर्ट हा जगातील चौथ्या क्रमांकाचा कमकुवत पासपोर्ट आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमधील पासपोर्टही खालच्या क्रमांकावर आहेत.
[ad_2]