( प्रगत भारत । pragatbharat.com)
Student Suicide In Kota: तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतील नकार ही पचवणे आजच्या पिढीला जड जात आहे. अलीकडेच राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी तिच्याशी बोलण्यासाठी गेली असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कृपांगीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपांगी तिच्या मामाच्या घरी राहत होती. तिचे वडिलही तिच्यासोबत तिथेच राहत होते. तिच्या वडिलांनी तिला मोबाईल फोन वापरण्यास नकार दिला त्यामुळं नाराज झालेली कृपांगी तिच्या खोलीत गेली. तर, तिचे वडिलही ऑफिससाठी गेले. मात्र, खूप वेळ झाला तरी कृपांगीच्या खोलीतून काहीच आवाज आला नाही. म्हणून तिच्या आजीने दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच आवाज आला नाही. तिच्या आजीला संशय आल्यानंतर तिने आजूबाजूच्या लोकांना बोलवले आणि पोलिसांनाही याबाबत सूचना दिली.
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले तर कृपांगीने गळफास घेतला होता. याबाबत पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. त्यावेळी तिच्या वडिलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, परीक्षा जवळ आल्याने मी तिला मोबाईल फोन देण्यास नकार दिला. याआधीही तिला सतत फोन वापरते म्हणून मी ओरडलो होतो. पण ती असं काही पाऊल उचलेल याचा आम्हाला कोणालाही अंदाज नव्हता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी कृपांगीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल समोर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, यावेळी पोलिसांना कोणतीही सुसाइट नोट सापडली नाहीये. मात्र, फोन न दिल्याच्या कारणावरुन विद्यार्थिनी इतकं टोकाचं पाऊल उचलेल याची कोणालाच कल्पना नव्हती. कृपांगीच्या आत्महत्येने सर्वांना एकच धक्का बसला आहे. तर, तिच्या वडिलांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
2023 मध्ये 26 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
2023 या वर्षांत कोटामध्ये 26हून जास्त विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. आव्हानात्मक परीक्षा, पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि घरापासून दूर असलेल्या एकाकीपणामुळे होणारा थोडासा ताण यामुळे आत्महत्यांच्या घटना दरवर्षी घडत होत्या. पण 2023 मध्ये कोचिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळं चिंतेत भर पडली आहे.