Supriya Sule Ajit Pawar Sunetra Pawar Baramati Loksabha Nationalist Congress Party Pune Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supriya Sule, Pune :  संसदेत माझा नवरा येत नाही. पण ज्याला उत्साह आहे. त्याने बायको संसदेत गेली की, कॅन्टीनमध्ये बसायचे पर्स घेऊन. संसदेत नोटपॅड लागते पर्स नाही. पर्समधून कोठे पैसे देणार आहात? तिथे नोटपॅड, पेन लागतो. नवऱ्याला त्या एरियामध्ये परवानगी नसते. मी माझ्या नवऱ्याच्या नावावर मतं मागत नाही,  असा सणसणीत टोला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार यांना लावलाय. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. 

माझं घर खासदारकीवर चालत नाही

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, तुम्हाला खासदार संसदेत बोलणारा पाहिजे की, इथे नवरा बोलणारा पाहिजे? त्यामुळे विचार करुन मतदान करा. सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केले, तरी मलाच संसदेत जाऊन बोलायचं आहे. माझं घर खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय की तुमचे इकडे काम नाही. आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला..खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही तुम्हाला माझ्या नवऱ्याने इथे भाषण केलेले चालेल का? संसदेत मी जाणारे की माझा नवरा जाणार आहे. 

भाजप खासदार संसदेत चुपचाप बसतात आणि पीएम मोदींचे कौतुक करतात 

महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. 10 विरोधात आहेत आणि 38 त्यांच्या बाजूने आहेत. 38 पैकी एकाने तरी महागाईचा म तरी काढलाय का? तिथे चुपचाप बसतात आणि पीएम मोदींचे कौतुक करत बसतात. त्यांचा महागाई, बरोजगारी आणि कोयता गँगशी काहीही संबंध नाही, असेही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्ट केले. 

15 लाख देतो म्हटले. आले का? पैसे आले असते तर माझे भाषण ऐकायला आला नसता. महागाई कमी झाली नाही. हे भ्रष्ट आहेत जुमलेबाज आहेत. 10 वर्षांपासून फसवाफसवी सुरु आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचे आयुष्य भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी गेलं. भ्रष्ट अशोक चव्हाणांना तुम्ही पदं देतात. मात्र, पंकजा मुंडेंना काहीच मिळत नाही, असा आरोप सुळे यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे फेरबदल, विजय करंजकरांची उमदेवारी निश्चित?

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts