Pakistan Drone Shot Down By BSF Personnel 2.5 Kg Heroin Seized

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Drone Shot Down:  पंजाबच्या अमृतसरमध्ये (Amritsar) आंतरराष्ट्रीय सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) गोळीबार करून पाडले आहे. ही घटना  घडली. ड्रोनने वाहून आणलेला 2.6 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे.पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार होतोय घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांत जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत. 

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसर, एक ड्रोन जप्त करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात बीसएफच्या जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत. तीन ड्रोन शुक्रवारी आणि चौथा ड्रोन शनिवारी रात्री पाडण्यात आले आहे. पहिले ड्रोन ‘डीजेआयस मॅट्रिस 300 आरटीके’  अमृतसर जिल्ह्यातील धारीवाल गावात मिळाले. बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता गोळीबार करून पाडले.

news reels Reels

पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले

दुसरे ड्रोन रतन खुर्द गावात पाडण्यात आले आहे. रात्री 9.30 वाजता गोळीबार करत हे ड्रोन पाडण्यात आले. हे ड्रोन अंमली पदार्थांची तस्करी करणारे होते. ड्रोनसोबत अंमली पदार्थांचे दोन पाकिटे होती. 2.6 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तीसऱ्या ड्रोनला देखील रोखण्यात आळे. परंतु गोळीबार केल्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. तर चौथे ड्रोन शनिवारी पाडण्यात आले आहे.  या ड्रोनने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. अमृतसर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ड्रोनने अंमली पदार्थाची एक बॅग वाहून आणली होती.

ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न

 अंमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्यातील काही ड्रोन  बीएसएफने गोळीबार करून पाडली होती. आता पुन्हा ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब,  येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा झालेले प्रयत्न लष्कराने हाणून पाडले.



[ad_2]

Related posts