Manoj Jarange Insists On 24th December Ultimatum Chhatrapati Sambhaji Nagar Beed Police And Maratha Protestors Meeting Maratha Reservation Marthi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मराठवाड्यातील पोलीस प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), बीड (Beed) पोलिसांकडून मराठा आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठकांचा सत्र सुरू आहे. सोबतच आज धाराशिवमध्ये (Dharashiv) मराठा आंदोलकांशी (Maratha Protestors) प्रशासनाची बैठक होणार आहे. त्यामुळे एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगी यांची भेट घेऊन 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्याची विनंती केली होती. त्यामुळे जरांगे यांच्याकडून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्ग लावण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, या मुदतीला आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या तीन दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर बीडच्या 23 डिसेंबरच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेटमवर मनोज जरांगे ठाम आहे. त्यामुळे 23 डिसेंबरच्या सभेत मनोज जरांगे कोणती घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Related posts