Ban on use of cold medicines for children Big decision of Govt

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anti-Cold Cocktail Medicine Ban: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काही वैद्यकीय घटकांचे मिश्रण असलेल्या अनेक सर्दी-विरोधी औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे (DCGI) राजीव रघुवंशी यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियामकांना क्लोरफेनिरामाइन मॅलेट आईपी 2एमजी (IP 2mg) +  फेनिलफ्राइन एचसीएल आईपी 5एमजी ड्रॉप/एमएल ( Phenylephrine HCl IP 5mg Drop/ml ) चे ‘फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन’ (FDC) फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (FDC) च्या उत्पादकांना औषधाच्या लेबल आणि पॅकिंगमध्ये ही वॉर्निंग वापरण्याची सूचना केली आहे. ज्यामध्ये चार वर्षांखालील मुलांसाठी एफडीसीचा वापर करू नये, असं म्हटलं गेलंय. 

DCGI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, प्रोफेसर कोकटे समितीला तर्कशुद्ध घोषित करण्यात आलं आहे. त्याच्या शिफारशीच्या आधारे, कार्यालयाने 17 जुलै 2015 रोजी 18 महिन्यांच्या धोरणात्मक निर्णयानुसार FDC चे उत्पादन आणि विपणन चालू ठेवण्यासाठी ना हरकत पत्र (NOC) जारी केलं होतं.

जूनच्या तज्ज्ञ समितीने याबाबत केली होती चर्चा 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांसाठी सर्दी-विरोधी औषधांच्या घटकीकरणास ( Componentization ) प्रोत्साहन देण्याबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे. 6 जून रोजी झालेल्या विषय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.

FDC 4 वर्षाखालील मुलांसाठी वापरू नये

या पत्रात म्हटल्यानुसार, “समितीने शिफारस केली आहे की 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये FDC चा वापर करू नये,” त्याचप्रमाणे कंपन्यांनी या संदर्भातील इशारा देणारे लेबल आणि पॅकिंगवर नमूद करावेत.

Related posts