morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 28th March 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

काय सांगता! लोकसभा लढवण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांकडे नाहीत पैसे; स्वतः निर्मला सीतारामनांनी केला खुलासा

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याचा प्रस्तावाला नकार दिला आहे. यामागचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याची माहिती स्वतः निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी त्यांना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) किंवा तामिळनाडूमधून (Tamil Nadu) निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. वाचा सविस्तर 

LIC ची सुपर डुपर हिट स्कीम; प्रतिदिन 121 रुपये भरा अन् मॅच्युरिटीनंतर 27 लाखांचा मोठ्ठा परतावा, मुलीच्या लग्नाचं टेन्शनच विसरा!

LIC Kanyadan Policy : मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच, एलआयसी (Life Insurance Corporation) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी. एलआयसीकडून गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. अगदी नवजात बाळापासून ते प्रोढ आणि वयोवृद्धांपर्यंत एलआयसी विविध योजना गुंतवणूकदारांना देते. एलआयसीनं वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमधून बचत करण्यासोबतच मोठा निधी उभारण्यात गुंतवणूकदारांना मदत होते. एलआयसीनं मुलींसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे मुलींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा संपूर्ण ताण दूर होऊ शकतो. साधारणपणे भारतात मुल जन्माला येताच, लोक तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी करू लागतात, मग ती मुलगी असो वा मुलगा. जर तुम्ही देखील या यादीत असाल तर तुम्हीही तुमच्या मुलीसाठी ‘एलआयसी कन्यादान पॉलिसी’ (LIC Kanyadan Policy) घेऊ शकता. या योजनेच्या मदतीनं मुलीच्या लग्नाची चिंता दूर होईल आणि अगदी धुमधडाक्यात तुम्ही तिचं लग्न करू शकता. वाचा सविस्तर 

महिलांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ क्षेत्रात मिळणार लाखो नोकऱ्या, अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना

Women Job News : अलिकडच्या काळात सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला (Women) काम करताना दिसत आहेत. सर्वच क्षेत्रात महिलांचा वावर वाढताना दिसतोय. मात्र, अद्याप नोकरीच्या (Job) क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिला कमीच आहेत. देशातील निम्मी लोकसंख्या ही महिलांची असूनही नोकरीच्या क्षेत्रात महिला कमीच आहेत. दरम्यान, महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये महिलांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. फक्त सरकारला GDP चा छोटासा भाग या क्षेत्रात खर्च कारावा लागेल. हा खर्च देशासाठी महिलांसाठी खूप महत्वाचा असणार आहे. यातून अर्थव्यवस्थेला (economy) मोठा फायदा होणाराय. वाचा सविस्तर 

Nitin Gadkari Property : नेहमी कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या गडकरींची स्वतःची संपत्ती किती?; पाच वर्षांत 51 टक्क्यांनी वाढ

Nitin Gadkari Property : मोदी सरकारमध्ये (Modi Government) मागील 10 वर्षात नेहमी कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरींची (Nitin Gadkari) चर्चा राहिली आहे. मात्र, स्वतः गडकरी यांची संपत्ती (Property) किती असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. दरम्यान, बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज भरतांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. ज्यात मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 28 March 2024 : आजचा गुरुवार खास! ‘या’ राशींवर राहणार दत्तगुरुंची कृपा; सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 28 March 2024 : पंचांगानुसार, आज 28 मार्च 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आजच्या दिवशी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा देखील येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या… वाचा सविस्तर 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts