Anant Ambani Radhika Merchant wedding Mukesh Nita Ambani family Reliance constructing new temples in Jamnagar Gujarat marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) हे दोघे 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. एकीकडे ते  सात फेरे घेतील, त्याचवेळी गुजरातला अंबानी परिवाराकडून 14 मंदिरं भेट देण्यात येणार आहेत. गुजरातच्या जामनगर परिसरात अंबानी परिवारातर्फे 14 नवीन मंदिरं तयार करण्यात आली आहेत. 

रिलायन्सने शेअर केला व्हिडीओ

अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगर परिसरात मोतीकाहवाडी या ठिकाणी ही 14 मंदिरे बांधली आहेत. नुकतेच नीता अंबानी यांनी या मंदिरांच्या बांधकामाचा आढावा घेतला आणि तेथे काम करणाऱ्या कारागिरांशी चर्चा केली. रिलायन्स उद्योगसमूहाने त्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

 

रिलायन्स फाऊंडेशनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, या मंदिरांमध्ये कोरीव खांब, फ्रेस्को शैलीतील पेंटिंग्ज, प्राचीन स्थापत्यकलेपासून प्रेरित रचना आणि देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. देशाचा प्राचीन इतिहास आणि परंपरा एकत्र आणण्याचा आणि जतन करण्याचा हा प्रयत्न आहे.

जामनगरमध्ये बांधण्यात येत असलेल्या या मंदिरांच्या कामासाठी रिलायन्स ग्रुपने देशातील विविध ठिकाणांहून कारागिरांना एकत्र आणलं आहे. त्यांच्याकडून या मंदिरांची निर्मिती करण्यात येत आहे.

अनंत-राधिकाचा मार्चमध्ये प्री-वेडिंग सेरेमनी 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह जुलैमध्ये होणार आहे. पण त्यांचा प्री वेडिंग सेरेमनी हा 1 ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाच्या मुलाच्या लग्नाला जगभरातून अनेक पाहुणे येणार आहेत.  या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचा समावेश आहे.

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग कसं असेल? (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding)

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मार्चला ‘एन ईवनिंग इन एवरलँड’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा ड्रेसकोड इलीगेंट कॉकटेल असा आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान संगीत, नृत्य, लाईव्ह सादरीकरण आणि पाहुण्यांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..[ad_2]

Related posts