[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Thane: भिवंडीच्या निजामपूर शहर महानगर पालिकेअंतर्गत नाले आणि गटार सफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र तरीही, दरवर्षी भिवंडीत जलमय परिस्थिती पाहायला मिळते आणि याला जबाबदार नाला आणि गटरसफाईत होणारे भ्रष्टाचार असल्याचा आरोप समाजसेवक परशुराम पाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महानगर पालिकेला अर्ज देखील केला, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे समाजसेवक परशुराम पाल यांनी प्रत्यक्षात भ्रष्टाचार कशाप्रकारे होत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. थेट गटार आणि नाल्यामध्ये उतरून त्यातील गाळ बाहेर काढत त्यांनी पालिकेला समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजसेवक परशुराम पाल यांच्या मते गटार आणि नालेसफाई करताना दोन चेंबरमधील अंतर तब्बल पाच मीटर असून, फक्त चेंबरखाली असलेला गाळ पालिकेच्या ठेकेदारांकडून काढण्यात येतो आणि उर्वरित गाळ गटारातून काढलाच जात नाही. ठेकेदारांकडून नाले आणि गटार सफाई करत असल्याचा नाम मात्र देखावा केला जातो, पण प्रत्यक्षात हवी तशी नाला आणि गटर सफाई केली जात नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप पाल यांनी केला आहे.
‘फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण’
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळालं असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी याआधी केलं आहे. फडणवीस गृहमंत्री झाल्यानं भ्रष्टाचार करणाऱ्यांची अडचण झाली नसून, त्यांना संरक्षण मिळालं आहे. विशेषत: त्यांच्या पक्षात जे आहेत, त्या लोकांना असे राऊत म्हणाले. त्यांच्या अवती भवती असलेले चोर लुटारु, भ्रष्टाचारी या सगळ्यांना संरक्षण मिळत आहे. 500 कोटींचे गैरव्यवहाराचे प्रकरण मी पुराव्यानिशी दिलं आहे, तरी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं राऊत म्हणाले होते.
दादा भुसेंच्या साखर कारखान्यात 1800 कोटींचा गैरव्यवहार
दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचे 1800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून मी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचे (Bhima Patas Sugar Factory) प्रकरण CBI कडे पाठवले आहे. मी वारंवार गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या कारखान्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याचे राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयला मी पूर्ण सूट दिली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते असे राऊत म्हणाले. म्हणून हे प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहे. सध्या राज्याचे गृहमंत्री याकडं लक्ष देत नसल्याचे राऊत म्हणाले.
हेही वाचा:
NCP News : राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या तटकरेंच्या हाती, सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय खजिनदार
[ad_2]