Neechbhang Rajyoga 2023 is formed due to transit of Mars 3 zodiac signs will get money only money

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Neechbhang Rajyoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम हा 12 राशींवर होत असतो. एका ठराविक काळानंतर ग्रह राशी बदलतात. यावेळी मंगळाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. जेव्हा एखादा ग्रह गोचर करतो त्यावेळी त्याचा इतर ग्रहांशी संयोग होतो. अनेकदा ग्रहांच्या स्थितीनुसार काही शुभ आणि अशुभ योग तयार होतात.

सेनापती मंगळ 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केला आहे. यावेळी कर्क राशीत मंगळाच्या प्रवेशामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. हा नीचभंग राजयोग 3 राशींच्या व्यक्तींसाठी चांगला परिणाम देणारा ठरणार आहे. ज्यामुळे काही लोकांना धन आणि सन्मान मिळू शकणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना स्थावर मालमत्ता, मालमत्ता, जमीन-मालमत्तेशी संबंधित उत्तम यश मिळू शकणार आहे. गरजू व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याबद्दल तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.

मिथुन रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये  नवीन संधी मिळणार आहेत. योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला मोठे फायदे होणार आहेत. शिवाय तुमच्या स्वभावामध्ये बदल दिसून येणार आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यवसायिकांना दिलेले पैसे परत मिळू शक्यता आहे. तसंच तुम्ही तुमच्या बोलण्याच्या जोरावर इतरांची मनं जिंकून घेऊ शकता.

कन्या रास

ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नीचभंग राजयोग फायदेशीर असणार आहे. यापूर्वी तुम्ही केलेली जुनी गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळामध्ये तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बळाची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलाच्या विचारात असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts