How Many Steps Should Walk Every Day to lose Weight And Healthy Life Through Researcher; Walk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Walking Health Benefits : चालण्याने शरीराला अनेक फायदे तर मिळतातच शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. चालणे हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे. जो संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो. सीडीसीच्या मते, दररोज किमान 8 ते 10 हजार पावले चालल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

चालणे केवळ वजन नियंत्रित ठेवत नाही तर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याशिवाय हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे देखील चांगले मानले जाते. चालण्याने स्नायू आणि सांधे मजबूत होतात. हे तणाव आणि चिंता कमी करून मेंदूचे कार्य सुधारण्यास देखील मदत करते. चालण्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. अनेकांना सकाळी तर काहींना संध्याकाळी फिरायला आवडते. पण वजन कमी करण्यासाठी चालणे केव्हा जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

सकाळी किंवा संध्याकाळी कधी चालावे?

ओबेसिटी जर्नल (Ref) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी चालणे हा अतिशय सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी चालत जाऊ शकता हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. सकाळी ७ ते ९ ही वेळ उत्तम मानली जाते. जर तुम्हाला सकाळी चालता येत नसेल तर संध्याकाळी आणि रात्री चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

चालल्यावरही वजन कमी का होत नाही?

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्य तितक्या कमी कॅलरीज वापरणे. दररोज 8 ते 10 हजार पावले टाकून किंवा 1 तास चालल्यानंतरही तुमचे वजन कमी होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या कॅलरीजचे प्रमाण जास्त आहे. तुम्ही फक्त व्यायाम आणि चालण्याने वजन कमी करू शकत नाही. इतर गोष्टींवरही लक्ष ठेवा.

चालण्यासोबतच या गोष्टींची घ्या काळजी 

दररोज 200 ते 300 कॅलरी कमी खा
तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा
अन्नामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि सूक्ष्म पोषक घटक असावेत.
रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या
साखर, मिठाई, चिप्स, कोल्ड्रिंक्स, जंक फूडचे सेवन कमी करा

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Related posts