Rohit Sharma Passed Away Rajasthan Ranji Trophy Former Player Cricketer Rohit Sharma Passes Away At 40 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं (Rohit Sharma) निधन झालं आहे. माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. राजस्थान रणजी क्रिकेट संघातील (Rajasthan Ranji Trophy) माजी क्रिकेटपटू (Former Player) रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या बातमीनंतर संपूर्ण क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे. 

माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

राजस्थानचा माजी खेळाडू रोहित शर्माचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. तो आक्रमक फलंदाज होता आणि लेग-स्पिन गोलंदाजीही करत होता. प्रकृती खालावल्याने रोहित शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोहित शर्मावर यकृताशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते. 

चार-पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल

मीडिया रिपोर्टनुसार, मिळालेल्या माहितीमध्ये समोर आलं आहे की, राजस्थानचा माजी सलामीवीर रोहित शर्माचं शनिवारी जयपूर शहरातील रुग्णालयात निधन झालं आहे. तो 40 वर्षांचा होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला यकृताशी संबंधित समस्या होत्या आणि चार-पाच दिवसांपूर्वी त्याला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी त्यांचं निधन झालं आहे.

राजस्थान माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

आक्रमक फलंदाजांमध्ये रोहित शर्माचं नाव

राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांमध्ये रोहित शर्माच्या नावाचा समावेश आहे. रोहित शर्मा आतापर्यंत राजस्थान रणजी संघाकडून 7 रणजी सामने खेळला आहे. याशिवाय त्याने 28 एकदिवसीय रणजी सामने आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. रोहित शर्माची जयपूरमध्ये आरएस अकादमी नावाने क्रिकेट अकादमीही आहे.

रोहित शर्मा राजस्थान रणजी संघाचा माजी क्रिकेटपटू

रोहित शर्मा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. रोहित शर्मा राजस्थान रणजी संघाचा माजी क्रिकेटपटू होता. रोहितच्या निधनामुळे राजस्थान क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. रोहित शर्माने अनेक रणजी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

2004 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यात राजस्थानसाठी पदार्पण

राजस्थानचा माजी क्रिकेटपटू रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत 1147 धावा केल्या आणि 7 विकेट घेतल्या. त्याने 2004 मध्ये सर्व्हिसेस विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात राजस्थानसाठी पदार्पण केले आणि 2014 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळला. आरएस क्रिकेट अकादमीमध्ये या त्याच्या स्वत:च्या तो युवा क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे देत होता.

रणजीपटू रोहित शर्माबद्दल अधिक माहिती

  • जन्म – 7 नोव्हेंबर 1983
  • जन्म ठिकाण – जयपूर
  • वय – 40 वर्षे
  • फलंदाज – उजव्या हाताचा फलंदाज
  • बॉलिंग – लेग ब्रेक

 

 

[ad_2]

Related posts