[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mamata Banerjee, India Alliance: नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “माझी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हणत आले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही”
अधिक पाहा..
[ad_2]