Sun Mars conjunction will occur after 18 months These signs can have golden days

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sun And Mangal Conjunction In Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्य राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा दोन ग्रहांचे संयोग होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चच्या मध्यात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा संयोग होणार आहे. 

तब्बल 18 महिन्यांनंतर कुंभ राशीमध्ये सूर्य आणि मंगळ यांचा संयोग होणार आहे. मंगळ एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलून साधारण 18 महिन्यांनंतर येतो. अशा परिस्थितीत या दोघांच्या संयोगामुळे काही राशींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे.

मेष रास (Kumbh Zodiac)

मंगळ आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात भागीदार देखील मिळू शकेल ज्याला भविष्यात नफा मिळणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

मंगळ आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. रिअल इस्टेट, मालमत्ता आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. 

मकर रास (Makar Zodiac)

मंगळ आणि सूर्य देवाचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमच्या व्यक्तींच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जमिनीच्या व्यवहारात तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. घरातील सदस्यांमध्ये गोडवा राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts