Yugendra Pawar visit Baramati taluka village for Supriya Sule Lok Sabha Election campaigning Ajit Pawar Sunetra Pawar marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Baramati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. अशात अजित पवारांचे (Ajit Pawar) सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे युगेंद्र पवारांनी काकांची साथ सोडून आता आत्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी आज युगेंद्र पवार बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत. पवार कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे. पवार कुटुंबातील व्यक्ती माझा प्रचार करणार नाही असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांचा सख्खा पुतण्या आत्यासाठी प्रचार करणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बारामतीची चर्चा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अधिक असणार आहे. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात थेट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशात आता पवार कुटुंब कोणाचा प्रचार करणार अशी चर्चा असतानाच, अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. 

कोण आहेत युगेंद्र पवार? (Who is Yugendra Pawar) 

  • अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव
  • युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार 
  • शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय
  • शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली
  • वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले
  • फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात
  • बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार

सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर झळकले…. (Supriya Sule Banner)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून अनेक बैठका होत असून, अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतांना बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकले आहेत. अनेक ठिकाणी असे बॅनर लावण्यात आल्याने महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची बारामतीमधील उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांकडून देखील महायुतीकडून सुनेत्रा पवारच उमेदवार असणार असल्याच्या पोस्ट शेअर करण्यात येत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Yugendra Pawar : दिल्लीपुढे झुकणार नाही! आजोबांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’ मिळताच युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकले

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts