Indian Navy to commission MH 60R Sea hawk MH 60R anti submarine Helicopter multi role formal commission in indian navy defence ministry marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Navy : भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदलात नवा योद्धा सामील होणार आहे. भारतीय नौदलात MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर (MH-60 Romeo Helicopter) दाखल होणार आहे. भारतीय नौदलासाठी बुधवार हा मोठा दिवस आहे. 6 मार्च रोजी MH-60 Romeo हेलिकॉप्टर नौदलात सामील करण्यात येतील. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून MH60R Seahawk हेलिकॉप्टरचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.

भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार

भारतीय नौदल 6 मार्च, 2024 ला MH60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर आपल्या ताफ्यात समाविष्ट करेल. भारतीय नौदल अँटी सबमरिन हेलिकॉप्टर सामील करणे, ही तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक मोठं पाऊल आहे. या हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या तळाशी असणाऱ्या शत्रुच्या पाणबुड्या नष्ट करण्यात भारतीय नौदलाला मदत होईल. कोची (Kochi) येथील आयएनएस गरुडमध्ये (INS Garuda) मध्ये नवीन स्क्वाड्रन बनवून हेलिकॉप्टर सामील करण्यात येणार आहे.

नौदलात दाखल होणार नवा योद्धा

2020 मध्ये अमेरिकेसोबत MH-60R रोमिओ 24 हेलिकॉप्टरचा करार करण्यात आला होता. या हेलिकॉप्टरचे स्क्वाड्रन आयएनएस 334 या नावाने ओळखलं जाईल. हे हेलिकॉप्टर समुद्रात शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्यात मदत करते.

MH-60 Romeo हेलिकॉप्टरचा व्हिडीओ समोर 

 

 

 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts