Mumbai Pune Express Highway Accident Traffic On The Mumbai-Pune Express Highway Tanker Got Fire At Khandala Ghat Two Died

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Pune Express Highway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.

टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, एक मृतदेह एक्सप्रेसवेवरच पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

[ad_2]

Related posts