Shahbaz Nadeem Announces Retirement From All Forms Of Cricket

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shahbaz Nadeem : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये सात मार्चपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. धर्मशालामध्ये कसोटी सामना सुरु होण्याआधीच भारताच्या (Team india) फिरकी गोलंदाजानं निवृत्तीची घोषणा केली आहे. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम यानं मंगळवारी निवृत्तीची घोषणा (left-arm spinner Shahbaz Nadeem announces retirement) केली. त्यानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. शाहबाज नदीम याने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत, पण त्यानंतर तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. 

शाहबाज नदीम देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचं प्रतिनिधित्व करत होता. त्यानं रणजी स्पर्धेत (2022-23) राजस्थानविरोधात आपला अखेरचा फर्स्ट क्लास सामना खेळला, त्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. शाहबाज नदीमच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 542 विकेटची नोंद आहे. शाहबाज नदीम जगभरात होणाऱ्या विविध टी 20 लीग स्पर्धेत खेळला आहे. 

34 वर्षीय नदीमने ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ सोबत बोलताना निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला की, खूप दिवसांपासून मी निवृत्तीचा विचार करत होता. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मते तुमच्याकडे काही करण्याची प्रेरणा (भारतासाठी खेळण्याची) असेल, तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावाच. पण मला माहितेय, आता भारतीय संघात मला स्थान मिळणार नाही. त्यामुळे आता युवा खेळाडूंना संधी द्यावी, असं मला वाटतेय. जगभरात होणाऱ्या टी 20 स्पर्धेत खेळण्याबाबत विचार करत आहे. 

भारतासाठी दोन कसोटी – 

शाहबाज नदीम यानं टीम इंडियासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. 2019 ते 2021 यादरम्यान त्यानं दोन कसोटी सामने खेळलेत. चार डावात गोलंदाजी करताना त्यानं आठ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च कामगिरी 40 धावांच्या मोबदल्यात चार विकेट अशी राहिली आहे. 2019 मध्ये रांची कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाविरोधात त्यानं पदार्पण केले. त्यानं दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरोधात फेब्रुवारी 2021 रोजी चेन्नईमध्ये खेळला. 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 542 विकेट 

झारखंडसाठी खेळणाऱ्या शाहबाज नदीम यानं 140 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यानं 28.86 च्या सरासरीने 542 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं 7/45 सर्वोच्च कामगिरी केली आहे. त्याशिवाय 191 डावात फलंदाजी करताना त्यानं 2784 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 2 शतकं आणि 8 अर्धशतकं ठोकली आहेत.



[ad_2]

Related posts