Health Benefits Of Drinking Turmeric Tea In Monsoon; सकाळी उपाशीपोटी प्या हा चहा आणि पावसाळ्यात ठेवा सर्व आजारांना दूर, डायबिटीस रूग्णांसाठी वरदान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डायबिटीससाठी फायदेशीर

डायबिटीससाठी फायदेशीर

पावसाळ्यात सर्वाधिक त्रास होतो तो डायबिटीस रूग्णांना. दरम्यान पावसाळ्यात हळदीचा चहा हा मधुमेही रूग्णांसाठी वरदान ठरतो. हळदीच्या चहामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असून शरीरातील रक्तातील साखर कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो. नैसर्गिक गुणांनी युक्त असणाऱ्या हळदीच्या चहामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

प्रतिकारशक्तीसाठी उत्तम

प्रतिकारशक्तीसाठी उत्तम

हळद ही अँटीसेप्टिक असून यामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा साठा असतो. आजारपणापासून दूर राहण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्तीचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक असा हळदीचा चहा तुम्ही रोज सकाळी पिऊन आजारांना दूर ठेऊ शकता.

(वाचा – पायांवरून कळेल हृदयाची अवस्था, अभ्यासातून झालाय धक्कादायक खुलासा)

हृदयालाही मिळतो फायदा

हृदयालाही मिळतो फायदा

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी अथवा हृदय रोगाचा त्रास असल्यास, हळदीच्या चहामध्ये काळी मिरी पावडर आणि तूप घालून तुम्ही उकळून प्यायल्यास याचा फायदा मिळतो. या मिश्रणाच्या नियमित सेवनाने हृदयाच्या अनेक आजारांपासून दूर राहण्यास तुम्हाला मदत मिळते. त्यामुळे याचे सकाळी उपाशीपोटी सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

(वाचा – कोथिंबीरच्या पाण्याचे कमाल फायदे, वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती वाढविण्यापर्यंत ठरते चमत्कारी)

डोळ्यांसाठी होते मदत

डोळ्यांसाठी होते मदत

हळदीच्या चहामध्ये विटामिन ए चे प्रमाण अधिक दिसून येते. तुम्हाला डोळ्यांची काळजी घ्यायची असेल तर नियमित हळदीचा चहा पिणे योग्य ठरू शकते. शरीराच्या अन्य तुलनेत डोळ्यांकडे आपले दुर्लक्ष होत असते. मात्र आयुर्वेदानुसार तुम्ही हळदीचा उपयोग करून डोळ्यांची काळजी घेऊ शकता.

(वाचा – ५ आजार करेल छूमंतर ही काळी बी, पोषक तत्वांनी भरलेल्या Kalonji चे किती आणि कसे करावे सेवन)

सांधेदुखीच्या सुटकेसाठी लाभदायक

सांधेदुखीच्या सुटकेसाठी लाभदायक

सध्या व्यायामच्या अभावामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. या त्रासापासून दूर राहण्यासाठी हळदीच्या चहाचे सेवन लाभदायक ठरते. अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे सांध्याच्या त्रासापासून याची सुटका लवकर होते. पावसाळ्यात पायाला आणि गुडघ्याला येणारी सूज कमी करण्यासाठीही हळदीच्या चहाचा उपयोग होतो.

हळदीचा चहा कसा बनवावा

हळदीचा चहा कसा बनवावा
  • १ ग्लास पाण्यात १ चमचा हळद मिक्स करा
  • यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करा
  • हे मिश्रण मंद गॅसवर तुम्ही उकळवा आणि नंतर गाळून घ्या
  • गाळलेल्या या हळदीच्या चहात मध आणि लिंबू मिक्स करून हा चहा प्या

संदर्भ

https://www.webmd.com/diet/turmeric-tea-good-for-you

https://artfultea.com/blogs/wellness/turmeric-tea-benefits

https://health.clevelandclinic.org/turmeric-health-benefits/

[ad_2]

Related posts