[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका ऑईल टँकरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलावर एक ऑईल टँकर पलटी झाला, ज्यामुळे त्याला आग लागली. आगीचे लोळ पुलाखाली पडले, ज्यामुळे पुलाखालून जाणाऱ्या एका कारला भीषण आग लागली. कारमधील एक महिला या आगीत होरपळलीये.. तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली. मुंबईकडे जाणारी वाहतूक मंत्र अजून बंदच आहे. </p>
[ad_2]