Infinix Smartphone smart 8 hd buy at just 1300 rupees on discount order online marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Infinix Smartphone : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त चांगले फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Smart 8 ही तुमच्यासाही चांगली संधी ठरू शकते. कारण या स्मार्टफोनवर अशा काही भन्नाट ऑफर्स मिळतायत ज्याचा तुम्ही कधी विचारच केला नसेल. थोडक्यात सांगायचं तर, या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक नवीन धमाकेदार फीचर्स मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला अनेक शानदार ऑफर्सचा लाभही घेता येणार आहे. यामुळेच हा स्मार्टफोन तुमच्यासाठी कमीत कमी किंमतीत बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका असं आवाहनही कंपनीकडून करण्यात आलं आहे. 

Infinix SMART 8 स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स 

तुम्हाला जर Infinix SMART 8 हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Flipkart वरून Infinix SMART 8 (4GB+64GB) खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच, 22% डिस्काउंटनंतर तुम्ही हा स्मार्टफोन अगदी 6,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. याशिवाय स्मार्टफोनवर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट UPI वर एक वेगळी इन्स्टंट डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% थेट कॅशबॅक मिळेल.

इतकंच नाही तर, या स्मार्टफोनवर एक वेगळी एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला थेट 5,700 रुपयांची सूट मिळू शकते. पण, यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. जर ही सवलत देखील उपलब्ध असेल तर तुम्हाला फक्त 1300 रुपयांमध्ये स्मार्टफोन मिळेल. कंपनीकडून या स्मार्टफोनवर एक वर्षाची वॉरंटी देखील देण्यात आली आहे. तसेच, ॲक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन आज ऑर्डर केला तर तुम्हाला 11 मार्चपर्यंत हा स्मार्टफोन डिलीव्हर देखील केला जाईल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. 

Infinix SMART 8 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स 

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा पर्याय दिला जातोय. याशिवाय, 6.6 इंचाचा पॉवरफुल HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. तसेच 50MP+AI लेन्स उपलब्ध आहे. 8MP फ्रंट कॅमेरा देखील दिला जात आहे. 5000 mAh बॅटरीमुळे, तुम्हाला बॅकअपबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. Helio G36 प्रोसेसर स्पीड देखील चांगला आहे. म्हणजेच एकूणच हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Samsung : 11 मार्चला सॅमसंगचे दोन दमदार स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च; किंमत आणि वैशिष्ट्ये रिलीजआधीच लीक

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts