[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ट्रेंटा यांच्या घराजवळ झेब्रा क्रॉसिंग आहे. त्यावर ३० सेंटिमीटरचा खड्डा पडला होता. ट्रेंटा यांनी हा खड्डा कोल्ड बिटुमनचा वापर करुन बुजवला. यानंतर प्रशासनानं ट्रेंटा यांना नोटीस पाठवली आणि ८० हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितलं. हायवे कोडचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी धोकादायक काम कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय केल्याचं प्रशासनानं नोटिशीत नमूद केलं आहे.
ट्रेंटा यांच्यावरील कारवाईमुळे इटलीतील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपल्याला नोटिस पाठवणाऱ्या प्रशासनालाच आपणच नोटिस पाठवणार असल्याचं ट्रेंटा यांनी सांगितलं. रस्त्यावर असलेला खड्डा तुम्ही बुजवलात. तो पूर्ववत करा, असं प्रशासनानं नोटिशीत म्हटलं आहे. ‘त्यांना मी मूर्ख वाटत असेन, तर त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांनी मला डिवचलं आहे. आता मी प्रशासनाला नोटिस पाठवणार आहे. कारण खड्ड्यामुळे प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे,’ असं ट्रेंटा म्हणाले.
ट्रेंटा यांनी याबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. खड्डा बुजवण्यात यावा यासाठी मी पाठपुरावा केला. मात्र तीन महिने उलटून गेल्यावरही काहीच झालं नाही. त्यामुळे मीच खड्डा बुजवला. ट्रेंटा यांना फेसबुकवर संपूर्ण देशातून पाठिंबा मिळलाा आहे. अनेकांनी प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला आहे.
[ad_2]