Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting in Sharad Pawar Home Congress leaders present in meeting marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting : लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Date) आज जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आता जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. अशात महाविकास आघाडीतील जागावाटपांचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing) तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते (Congress leader) थोड्याच वेळात शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरी जाणार आहेत. काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेनिथल्ला आणि राज्यातील महत्त्वाचे नेते शरद पवारांची भेट घेणार आहेत. कालच्या बैठकीत झालेल्या चर्चेवरती आज पुन्हा एकदा शरद पवारांशी चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत शिवसेनेची (Shiv Sena) मागणी आणि वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) प्रस्ताव यावरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, या बैठकीनंतर अंतिम जागावाटपाचा निर्णय घेऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या असून, आज अंतिम बैठक होत असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटप करतांना काही जागांवरून एकमत होत नसल्याचे चित्र आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावावर देखील अंतिम निर्णय झालेला नाही. अशात आज निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे जागावाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे नेते थोड्याच वेळात शरद पवारांच्या घरी जाणार आहेत. यावेळी होणाऱ्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts