New Delhi national situation along lac stable but sensitive says army chief general manoj pandey | New Delhi : ‘LAC वर परिस्थिती स्थिर, पण संवेदनशील’; सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही सक्षम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

New Delhi : भारत-चीन सीमेवरील संघर्षात चार वर्षांनंतरही कोणताही बदल झालेला नाही. सीमेवरील परिस्थिती दिवसेंदिवस संवेदनशील होत चालली आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) यांनी शुक्रवारी सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थिती ‘स्थिर पण संवेदनशील’ आहे. ते म्हणाले की चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य आणि इतर घटकांची तैनाती ‘अत्यंत मजबूत’ आणि ‘संतुलित’ आहे. एका ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ते म्हणाले, “पायाभूत सुविधा आणि सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत सीमेवर काय घडामोडी घडत आहेत यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आणि लक्ष ठेवण्याची गरज आहे.” सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असंही जनरल मनोज पांडे म्हणाले. 

LAC च्या परिस्थितीवर लष्करप्रमुख काय म्हणाले?

‘इंडिया अँड द इंडो-पॅसिफिक: थ्रेट्स अँड चॅलेंजेस’ या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना जनरल मनोज पांडे म्हणाले की, LAC वर बारकाईने लक्ष ठेवताना, पायाभूत सुविधा आणि सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत इतर काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. या प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील तयारी यामुळे एलएसीवरील वाढता तणाव या प्रश्नाला लष्करप्रमुख उत्तर देत होते.

LAC परिस्थिती स्थिर आणि संवेदनशीलः लष्करप्रमुख
5 मे 2020 रोजी पूर्व लडाख सीमेवरील पँगॉन्ग लेक परिसरात हिंसक संघर्ष आणि जून 2020 मध्ये गलवान येथे झालेल्या गंभीर लष्करी संघर्षामुळे दोन्ही सैन्ये समोरासमोर उभी आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. LAC वर सध्याची स्थिती काय आहे? असा प्रश्न विचारला असता जनरल मनोज पांडे म्हणाले की, आत्ताची परिस्थिती स्थिर आणि संवेदनशील आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

लोकसभेचं बिगुल आज वाजणार, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार; निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडं देशाचं लक्ष

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts