Pune Crime Open prostitution in the name of spa in Pimpri Chinchwad police Rescue of four young girl | Pune Crime : पिंपरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला. पोलिसांनी (Pune Police) यावेळी चार तरुणींची सुटका केली. छापा टाकण्यात आलेल्या स्पा महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलं आहे. निगडीतील फोनिक्स ‘स्पा’वर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमध्ये इन्स्पिरिया मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या ‘स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.

चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर फोनिक्स ‘स्पा’मध्ये डमी ग्राहक पाठवला. तिथं वेश्याव्यवसाय केला जातो का? याची शहानिशा पोलिसांनी केली. यानंतर ‘स्पा’वर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ताचा पोलिस शोध घेत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts