Kerala Crime Girl going for tuition kidnapped CM Vijayan gave instruction to police;ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, 10 लाखांची खंडणी; मुख्यंत्र्यांनी पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kerala Girl Kidnapped: ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे धक्कादायकरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून मुलीला परत आणण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. केरळमध्ये हा प्रकार समोर आला आहे.दरम्यान, मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे. 

केरळमध्ये शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांकडून 10 लाखांची खंडणी मागितली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री विजयन यांनी पोलिसांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. घटनेच्या काही तासांनंतर, मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस प्रमुखांना या घटनेचा निर्दोष आणि जलद तपास करण्यास सांगितले. आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलीस सक्रियपणे मुलीचा शोध घेत आहेत. या घटनेबद्दल नागरिकांनी चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

मुलगी सुरक्षित असून तिला काहीही झाले नसल्याचे अपहरणकर्त्यांनी सांगितले. 10 लाख रुपये भरल्यानंतर बुधवारी सकाळी तिला परत सोडण्यात येणार आहे. पोलिसांना कळवू नका, असा इशाराही अपहरणकर्त्यांनी पोलिसांना दिला आहे. कथित खंडणी कॉलच्या ऑडिओ-रेकॉर्डिंगनुसार ही माहिती समोर आली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याआधी अपहरणानंतर काही तासांतच पालकांना 5 लाख रुपयांचा खंडणीचा फोन आला होता. पीडितेच्या घरी वाहिन्यांचे कर्मचारी, नातेवाईक, शेजारी आणि पोलीस जमा झाल्याने परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले.अपहरण झालेल्या मुलीच्या आईच्या मोबाईलवर कॉल आला आणि सुरुवातीला मुलगी सापडल्याची बातमी आली असे सर्वांना वाटले. मात्र, हा आनंद कमी वेळासाठी ठरला. कारण अपहरणकर्त्यांकडून मुलीच्या सुखरूप परतीसाठी 5 लाख रुपयांची मागणी करणारा खंडणीचा कॉल ठरला.सध्या, पोलिसांनी तरुणीचा वेगाने शोध घेत आहेत. कोल्लम, पठाणमथिट्टा आणि तिरुवनंतपुरम या दक्षिणेकडील जिल्ह्यांतील सर्व प्रमुख आणि लहान रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे.

अशा प्रकारे अपहरण 

मुलीच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, 4 अपहरणकर्ते असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. मुलगी तिच्या आठ वर्षांच्या भावासोबत ट्युशनसाठी जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या अपहरणतकर्त्यांनी मुलीचे अपहरण केले. जेव्हा मुलाने अपहरणकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला बाजूला ढकलले आणि मुलीला एका कारमध्ये नेले, असे पुयप्पल्ली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीसांकडून सीसीटीव्ही तपास

‘आम्ही परिसरातील कॅमेऱ्यांमधून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून ते तपासत आहोत. अपहरणासाठी वापरण्यात आलेली गाडी पांढऱ्या रंगाची होती. ती होंडा अमेझ किंवा स्विफ्ट डिझायर असू शकते’, असे पोलिसांनी सांगितले.  ही घटना दुपारी 4 ते 4.30 च्या दरम्यान घडली. आपल्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात पीडित भावाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलांचे पालक दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात परिचारिका आहेत.

Related posts