SIM Card New Rule from 1 july 2024 mnp not-allowed-within-seven-days of sim swapping says trai marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

SIM Card New Rule : सर्व मोबाईल धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) नुकतेच मोबाईल सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. हे नवीन नियम 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. ट्रायच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीच्या घटनांना आळा बसावा यासाठी नियमांत बदल करण्यात आले आहेत. पण, या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आता हे नवीन नियम नेमके कोणते आहेत? या संदर्भात जाणून घेऊयात.  

नियमांमध्ये काय बदल झाले?

नवीन नियमांनुसार, जर मोबाईल यूजर्सना अलीकडे त्यांचे सिम कार्ड स्वॅप केले असेल तर ते त्यांचा मोबाईल नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं तर सिम कार्डची देवाणघेवाण करणे याला सिम स्वॅपिंग (Sim Swaping) म्हणतात. जेव्हा सिम कार्ड हरवले किंवा तुटलेले असते तेव्हा सिम स्वॅपिंग केले जाते. असे झाल्यास, तुम्ही तुमच्या दूरसंचार ऑपरेटरला तुमचे जुने सिम नवीन सिमने बदलण्यास सांगणं गरजेचं आहे. 

काय होईल फायदा?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे फसवणुकीचे प्रकार घडतायत या समस्यांना कुठेतरी आळा बसावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. फसवणूक करणाऱ्यांना सिम स्वॅपिंग किंवा बदलल्यानंतर लगेच मोबाईल कनेक्शन पोर्ट करण्यापासून रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

सिम स्वॅपिंग म्हणजे काय?

आजच्या काळात सिम स्वॅपिंगच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, ज्यामध्ये फसवणूक करणारे तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे फोटो सहज काढतात. यानंतर त्यांना मोबाईल हरवण्याच्या बहाण्याने नवीन सिमकार्ड दिले जाते. त्यानंतर तुमच्या नंबरवर आलेला ओटीपी फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो.

TRAI ची शिफारस

TRAI ने दूरसंचार विभागाला (DoT) एक नवीन सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे ज्यामध्ये प्रत्येक इनकमिंग कॉलचे नाव मोबाईल यूजर्सच्या हँडसेटवर प्रदर्शित केले जाते, मग ते नाव संपर्क यादीमध्ये जतन केले गेले आहे किंवा नाही. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो. मात्र यामुळे गोपनीयतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

पेमेंटसाठी आता फोन, कार्ड विसरा; एक रूपयापासून ते 25 हजारांपर्यंत करू शकता ऑनलाईन पेमेंट; Airtel स्मार्टवॉचचं भन्नाट फीचर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts