amol kolhe criticizes shivajirao adhalrao patil for contesting from shirur constituency on ajit pawar party symbol general election 2024 marathi news political news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 मतदारसंघांपैकी काही जागांची विशेष रुपाने चर्चा होत आहे. यामध्ये शिरुर मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेवर महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे निवडणूक लढवणार आहेत. तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. ते मुळचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते असून या निवडणुकीत मात्र अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यावरच आता अमोल कोल्हेंनी भाष्य केलंय. त्यांनी आढळराव यांच्यावर खोचक शब्दांत टीका केलीय. 

अमोल कोल्हेंनी आढळरावांना डिवचलं

लोकशाही असल्यामुळे कोणी कोणताही उमेदवार घोषित करू शकतो. २०१९ साली काही वल्गना ऐकायला मिळाल्या होत्या. अजित पवारच नव्हे तर प्रत्यक्ष बराक ओबामा निवडून आले तरीही मीच खासदार होणार, असं आव्हान आढळराव यांनी दिलं होतं. तेच आढळराव आता अजित पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. शिवाजीराव आढळरावांच्या चौथ्या पक्षप्रवेशाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत, असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना डिवचलंय. 

दिलीप मोहिते पाटलांच्या राजकीय कोंडीवर कोल्हे म्हणाले…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते दिलीप मोहिते पाटील आणि आढळराव हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र या निवडणुकीत आढळराव हे अजित पवार यांच्या पक्षाच्याच तिकिटावर निवडणूक लढवणार असल्यामुळे मोहिते पाटलांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांना आता आढळरावांचा प्रचार करावा लागणार आहे. यावरही अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. दिलीप मोहिते पाटील हे अत्यंत लढवय्ये नेते आहेत. ते नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारे नेते आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, हे येणाऱ्या काळात समोर येईल, असं म्हणत त्यांनी मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते नाराज असून ते आढळरावांचा प्रचार करणार नाहीत, असं कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.

ही फक्त सुरुवात आहे- अमोल कोल्हे 

शरद पवार या निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करत आहेत. ते यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. यामध्ये कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती साहू महाराज यांचाही समावेश आहे. यावर बोलताना कोल्हे म्हणाले की, अजित पवार गटातील नेते निलेश लंके यांनी नुकतंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मी तेव्हाच म्हणालो होतो की हा फक्त ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे. मी अजूनही म्हणतोय की ही फक्त सुरुवात आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. 

माझ्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद- कोल्हे 

मी गावभेट दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या रुपाने संसदेत आमचा आवाज घुमतो, असं लोकांचं मत आहे. त्यामुळे माझ्या या दौऱ्याला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असा दावा त्यांनी केला.  

हेही वाचा 

अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंचा मोठा निर्णय! शिवाजीराव आढळरावांचा मार्ग सुकर; शिरुरचा तिढा सुटला?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts