IPL 2024: Virat Kohli hits the nets after two months, looks in sublime touch ahead of IPL 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Latest News Marathi: 17 जानेवारी 2024 ला भारतीय संघाचा आणि आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने शेवटची फलंदाजी केली होती. गेल्या 62 दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेला विराट 2024च्या आयपीएलच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. विराट कोहलीने गेल्या दोन दिवसांपासून आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. विराट कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. 

विराट कोहलीचे प्रशिक्षण अनेक छायाचित्रकार कव्हर करताना दिसले. विराट कोहलीने स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप केल्यानंतर बॅट हातात धरली. विराट कोहलीने नेटमध्ये अशी फलंदाजी केली की जणू तो क्रिकेटपासून कधीच दूर राहिला नाही. त्याने आरसीबीचा गोलंदाज करण शर्माविरुद्ध फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावखुऱ्या स्पिनरविरुद्ध फलंदाजी करताना दिसला. विराट कोहलीने आक्रमक वृत्ती स्वीकारत या दोघांविरुद्ध फटके खेळले. विराट कोहलीचा प्रत्येक फटका विरोधी गोलंदाजांसाठी इशाराच असल्याची चर्चा रंगली आहे.

विराट कोहलीला रोखणे कठीण

आयपीएलमध्ये विराट कोहलीला रोखणे जवळपास अशक्य आहे. आरसीबीचा हा दिग्गज फलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक 7263 धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 7 शतके झळकावली आहेत. गेल्या मोसमात विराटने 53 पेक्षा जास्त सरासरीने 639 धावा केल्या होत्या आणि 2 शतके झळकावली होती.

कोहलीला टीकाकारांना उत्तर देणार?

विराट कोहलीसाठीही हे आयपीएल खास आहे कारण या खेळाडूला पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना उत्तर द्यायचे आहे. विराट कोहली रजेवर गेल्यावर त्याच्या टीकाकारांनी अफवा पसरवायला सुरुवात केली की कोहलीची T20 विश्वचषक 2024 च्या संघात निवड होऊ शकत नाही, पण प्रश्न असा आहे की या खेळाडूला T20 संघातून कोणत्या आधारावर वगळणार? विराट कोहली या आयपीए हंगामात धावा करून सर्व शंका दूर करण्याची संधी आहे. विराटसमोर पहिले आव्हान चेन्नई सुपर किंग्जचे आहे, ज्यांच्याविरुद्ध त्याचा विक्रम चांगला नाही. हा सामना 22 मार्च रोजी आहे, विराट आरसीबीला विजय मिळवून देतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11 

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल/आकाश दीप आणि अल्जारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीविरोधातील संभाव्य प्लेईंग 11 – 

ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिजवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महीश तीक्षणा आणि मुस्ताफिजुर रहमान.   

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts