google drive warning spam attacks avoid these common mistakes marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Drive Update News : जर तुम्ही देखील गुगल ड्राईव्हचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सर्च इंजिन गुगल (Google) ने Google Drive यूजर्सना स्पॅम अटॅकच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. कारण ही परिस्थिती तुमच्यासाठी धोकादायक देखील असू शकते. अशा वेळी हा धोका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? हा धोका टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

विशेषत: हा अलर्ट अशा यूजर्ससाठी आहे जे Google Drive वापरतात. या इशाऱ्यात गुगलने स्पॅमबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह वापरत असाल तर तुम्ही हॅकिंगला बळी पडू शकता, असे सांगण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या रिपोर्टनुसार, गुगल ड्राईव्हवर गुगल अकाउंट यूजर्सना एक संशयास्पद फाईल पाठवली जातेय. अनेक यूजर्सने तक्रार केली आहे की त्यांना त्यांच्या Google अकाऊंटवर फाईल्स प्राप्त करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. Google ने पुष्टी केली आहे की त्यांना अशा स्पॅम हल्ल्यांबद्दल माहिती आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाईल आढळली तर ती स्पॅम रेंजमध्ये मार्क करा.

गुगलने सल्ला दिला आहे की, जर तुम्ही कोणतीही संशयास्पद फाइल स्वीकारण्यास मंजुरी दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच, मंजूर झालेले कोणतेही कागदपत्र उघडू नका.

कसं संरक्षण कराल?

यूजर्स त्यांना प्राप्त कोणत्याही संशयास्पद फाइल तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर टॅप करावे लागेल. जर संगणकात फाइल उघडली असेल तर तुम्हाला फाइलवर उजवे क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक किंवा रिपोर्ट या पर्यायावर टॅप करावे लागेल.

अशा फाईल्सचा रिपोर्ट करा 

Google ड्राईव्ह यूजर्स संशयास्पद दिसणाऱ्या फाइल्स स्पॅम फोल्डरमध्ये हलवू शकतात. Gmail प्रमाणे, ड्राइव्हमधील स्पॅम फोल्डर संभाव्य धोकादायक फायली संचयित करते ज्या एखाद्या खात्याशी संलग्न किंवा लिंक केल्या जाऊ शकतात. वापरकर्ते फक्त त्या फोल्डरमध्ये फाइल्स ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या :

SIM Card New Rule : मोबाईलचं Sim Card खरेदी करताय? सावध व्हा, TRAI कडून सिमकार्डचे नवीन नियम जारी; ‘या’ गोष्टी 1 जुलैपासून होतील बंद

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts