Daughter Kills Mother In Bangalore; बेंगळुरूमध्ये झोपेच्या ९० गोळ्या खाऊ घालत मुलीकडून आईची हत्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बेंगळुरू : कर्नाटकातील बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्याच आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर तिने आईचा मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये भरला आणि ही ट्रॉली बॅग घेऊन पोलिस ठाणे गाठले. आरोपी महिलेचे नाव ३९ वर्षीय सोनाली सेन असे आहे. ती बिलेकहल्ली भागातील एनएसआर ग्रीन अपार्टमेंटमध्ये राहते. ती पश्चिम बंगालची असून सहा वर्षांपासून येथे राहत आहे. ७० वर्षीय विभा पाल असे मृत महिलेचे नाव आहे.
तुझा नवरा तिच्यासोबत रंग उधळतोय! इंजिनीअरच्या बायकोला मेसेज; २०० किमीवरुन घरी आली अन्..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली तिची आई विभा पाल, पती आणि सासू-सासऱ्यांसोबत अपार्टमेंटमध्ये राहत होती. विभा पाल आणि सोनालीच्या सासू-सासऱ्यांमध्ये जवळपास रोजच भांडण व्हायचे. एकदा विभा पालने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. एका भांडणानंतर विभाने सांगितले की, तुझी सासू मेल्याशिवाय शांतता मिळणार नाही. तिला मारून टाक हेच बोलणं लक्षात ठेऊन तसेच रोजच्या भांडणाला कंटाळून सोनालीने एक निर्णय घेतला. तिने तिच्या आईला झोपेच्या ९० गोळ्या घेण्यास भाग पाडले. विभा पालने पोटदुखीची तक्रार केली तेव्हा सोनालीने तिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

त्यानंतर आरोपी महिला ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह भरून थेट मायको लेआउट पोलिस ठाण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ३९ वर्षीय सोनाली ही व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे. सोमवारीही सोनालीच्या सासू-सासऱ्यांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर सोनालीने विभाला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि नंतर टॉवेलने त्यांचा गळा दाबला. विभा मरण पावल्यावर सोनालीने एक मोठी सुटकेस रिकामी केली. त्यानंतर त्यात तिच्या आईचे शरीर भरले. ही ट्रॉली बॅग गाडीत ठेवली आणि सरळ पोलिस ठाणे गाठले. एवढी मोठी सुटकेस घेऊन महिला पोलीस ठाण्यात पाहून पोलिसांना वाटले की, कदाचित या महिलेला घरातून हाकलून दिल्याची घटना घडली असावी. त्यांनी महिलेला पीडित समजले.
Murder News: फिजिओथेरिपिस्ट तरुणी सुटकेस घेऊन पोलिसांत गेली, उघडातच फुटला घाम; चौकशी होताच हादरले
मात्र जेव्हा तिने ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह असल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सूटकेसच्या आत मृतदेहासोबत तिच्या मृत वडिलांचे आणि तिच्या आईचे फ्रेम केलेले चित्र सापडले. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा सोनालीने ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह असल्याचे सांगितले तेव्हा सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही. कदाचित त्या महिलेची मानसिक स्थिती बिघडली असावी असे त्यांना वाटले. पण जेव्हा त्यांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यानंतर तिचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Related posts