Mumbai Pune Express Highway Accident Three Members Of The Same Family Died On The Pune Mumbai Expressway

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Pune Express Highway Accident :  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडाने एका कुटुंबावर घाला घातला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यात माय लेकासह भाच्याचा समावेश होता. होरपळलेल्या जखमींना द्रुतगतीवरील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार मिळणं अपेक्षित होतं. मात्र हा पांढरा हत्ती फक्त मलमपट्टीच्या कामाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

वरे कुटुंबातील तिघांच्या या अपघातात मृत्यू झाला. सविता वरे आणि कुशल वरे या मायलेकासह भाचा रितेश कोशिरे या तिघांना गमवण्याच्या वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली आहे. त्यामुळे सगळ्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. वरे कुटुंबीय मूळचं लोणावळ्या लगतच्या राजमाची गावात राहतात. वरे कुटुंबातील कैलास वरे हे उदरनिर्वाहासाठी लोणावळ्यात राहतात. तिथूनच पत्नी, मुलगा आणि भाचा राजमाचीकडे निघाले होते. तेव्हाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पुलावर मिथेनॉल केमिकलचा टँकर पलटला आणि त्या तिघांच्या अंगावर ते केमिकल पडलं. यात होरपळून तिघांचा मृत्यू झाला. 

वरे कुटुंबियांसह सहा जण या आगीत होरपळले. त्यांना उपचारासाठी द्रुतगतीवरील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र तिथून पुढे नऊ किलोमीटरवर खाजगी रुग्णालयात जखमींना नेण्यात आलं. ट्रॉमा सेंटरमध्ये नीट उपचार होत नाहीत आणि फक्त मलमपट्टी करता येते, असं रिअॅलिटी चेक केल्यानंतर समोर आलं. अत्याधुनिक सुविधांची वानवा असल्याचा खुलासा खुद्द डॉक्टरांनी केला. द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये एक एप्रिललाच अठरा टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र सोयीसुविधांची वानवा असेल तर मग ही लूट कशासाठी?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. हे पाहता निष्पपांच्या बळीला केवळ चालकाला नव्हे तर एमएसआरडीसी आणि संबंधित यंत्रणा ही तितकीच जबाबदार आहे. ते या निष्पपांच्या कुटुंबीयांचं नुकसान कसं भरुन काढणार?, असाही प्रश्न निरुत्तरीत राहत आहे.

रिअॅलिटी चेकमध्ये काय समोर आलंय?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडातील जखमींना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार का दिले नाहीत, याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे. ट्रॉमा केअर सेंटरचे मेडिकल कॉर्डिनेटर डॉ अजय काळे यांनी याबाबतचा खुलासा केला. सेंटरमध्ये अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने इथे केवळ मलमपट्टी होते, त्याशिवाय इथे जखमींना आणताना फरपट होते. अपघात ओझर्डे परिसरातील ट्रॉमा केअर सेंटरच्याआधी झाला तरच जखमींना तातडीने इथे आणता येतं. मात्र अपघात ओझर्डेच्या पुढे मुंबईच्या दिशेने आणि पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर झाला तर जखमींना इथे आणण्यापेक्षा आमच्या पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं सोयीचं होतं, अशी कारण त्यांच्याकडून दिली जात आहेत. मग ट्रॉमा केअर सेंटरचा हा पांढरा हत्ती नेमका का पोसला जातोय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे सोबतच टोलमध्ये वाढ करुन एकाअर्थी हा जीवाशी खेळच सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे.

[ad_2]

Related posts