Anjali Nimbalkar In The Fray From Uttara Kannada Lok Sabha Constituency Strong Challenge In Front Of Bjp Mp Anantakumar Hegde Belgaum Karnataka Bjp Congress

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोल्हापूर : सीमाभागातील मराठी मतदारांची मोठी संख्या असणाऱ्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून (Uttara Kannada Lok Sabha constituency) काँग्रेसने (Congress) मोठा डाव टाकताना कोल्हापूरच्या (Kolhapur) सूनबाई आणि कर्नाटकमधील (Karnataka) वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर (Hemant Nimbalkar) यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अंजली निंबाळकर (Anjali Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. 

डॉ. अंजली निंबाळकरांच्या उमेदवारीने प्रथमच भाजपचे खासदार आणि सातत्याने वादग्रस्त विधाने करून भाजपलाच अडचणीत आणलेल्या अनंतकुमार हेगडेंसमोर आव्हान ठाकले आहे. प्रस्थापित खासदारांविरोधी लाट तसेच मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडलेला मराठा चेहरा असलेल्या अंजली निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने 2004 सालापासून खासदार असलेल्या अनंतरकुमार हेगडे यांच्यासाठी ही लढत सोपी नसेल. अंजली निंबाळकर या 2018-23 या दरम्यान बेळगावातील खानापूरच्या आमदार होत्या.  यावेळी त्यांनी आपल्या  प्रतिभेची चुणूक दाखवत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. 

कोण आहेत अंजली निंबाळकर? (Who is Anjali Nimbalkar) 

अंजली निंबाळकर या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) उमरगामधील आहेत. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नात असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू घराण्यातूनच मिळाले आहे. तसेच त्या कर्नाटकातील धडाडीचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. अंजली निंबाळकर या पेशाने डाॅक्टर असून त्यांनी मुंबईत स्त्रीरोगतज्ज्ञ क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेळगावच्या सिव्हील रुग्णालयामध्ये त्यांनी कर्तव्य बजावले. यावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती पहिल्यानंतर राजकारणाचा येण्याचा निर्णय घेतला. 

आमदारकी मिळताच खानापूरचा चेहरामोहरा बदलला 

अंजली निंबाळकर यांनी 2018-23 या दरम्यान बेळगावातील खानापूरच्या आमदार असताना कर्नाटकातील सर्वात मागास असलेल्या खानापूरचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांनी खानापूरात मोठं रुग्णालय बांधताना महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्याचा प्रश्न सोडवला. तसेच अंजलीताई निंबाळकर फौंडेशनच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर उभा केला. महिला आणि युवकांसाठी त्यांनी अनेक मेळावे, शिबीरे घेत प्रश्न मार्गी लावण्यात हातभार लावला. 

उत्तर कन्नड मतदारसंघात प्राबल्य कोणाचे? (Uttara Kannada Lok Sabha constituency) 

अंजली निंबाळकर यांना उत्तर कन्नडमधून काँग्रेसने उमेदवारी देताना एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मराठा चेहरा असल्याने आणि मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतल्याने अंजली निंबाळकर मतदारसंघात मराठी माणसांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघ हा आधीच्या कारवार मतदारसंघातून सुरुवातीपासून चर्चेत आहे. या मतदारसंघामध्ये बेळगावातील खानापूर, कित्तूर या दोन आणि उत्तर कन्नडमधील हल्याळ, कारवार, कुमठा, भटकळ, शिरसी आणि येलापूर या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. 

मतदारसंघात काँग्रेसची ताकद

उत्तर कन्नड मतदारसंघात आजघडीला पाच काँग्रेस आणि तीन भाजपचे आमदार आहेत. या मतदारसंघातून सध्या 2004 पासून ते आतापर्यंत भाजपचे अनंतकुमार हेगडे हे खासदार आहेत. मात्र, अनंतकुमार हेगडे यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून  भाजपला फक्त कर्नाटकमध्येच नव्हे, तर अवघ्या देशात अडचणीत आणलं आहे. घटना बदलावरून केलेल्या वक्तव्यावरून भाजपला हेंगडेंपासून अंतर ठेवून राहावे लागलं.  

अंजली निंबाळकरांची जमेची बाजू

अंजली निंबाळकर यांचं मराठीसह कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डॉ. अंजलीताई निंबाळकर फौंडेशन आणि खानापूर आमदारकीच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. थेट सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह दिल्लीतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.  

मराठी भाषिक मते निर्णायक ठरणार?

उत्तर लोकसभा मतदारसंघ हा सीमाभागातील मराठी भाषिकांचा प्रदेश आहे. त्यामुळे उत्तर कन्नड जिल्ह्यात मराठी भाषिक लोकसंख्या मोठी असल्याने आणि मराठी चेहराच रिंगणात असल्याने मोठा प्रभाव पडू शकतो. या मतदारसंघातील मोठा भाग अजूनही विकासापासून वंचित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरुवातीपासूनच अंजली निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे निंबाळकरांचा करिश्मा वापरून भाजपचा बालेकिल्ला आता काँग्रेस भेदणार का हे पाहावं लागेल. अंजली निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला आहे हे निश्चित आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts