होलिका दहनाला ‘या’ रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा…| Holi 2024 Dont accidentally wear black color during Holika Dahan rules Otherwise negative energy evil eye remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Holika Dahan 2024 Rules in Marathi : देशभरात होळीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. मार्केटमध्ये विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाईच्या दुकानात भुजियासह अनेक मिठाईने रंगली आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व रंगांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मथुरा, वारासणीमध्ये होळीला सुरुवात झाली आहे. होळीचा हा सण महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होता. कोकणात तर होळी म्हणजे शिमग्या तब्बल 15 दिवस चालतो. इथे गावदेवता प्रत्येक गामस्थांच्या दारात येते. प्रत्येक राज्याची आणि गावांची होळीची वेगवेगळी परंपरा आहे. 

यंदा होळीचा हा सण 24 मार्चला होलिका दहन (Holika Dahan Date and Time) तर 25 मार्चला (Holi Date) रंगांची उधळण म्हणजे धुलिवंदन किंवा अर्थात धुळवड खेळली जाणार. होलिका दहनामागे वैज्ञानिक कारणासह धार्मिक कारणही आहे. यादिवशी वाईट शक्ती म्हणजे होलिका आणि चांगली शक्ती भक्त प्रल्हाद यांच्या आख्यायिकेशी जोडलेली आहे. चांगली वृत्तीचा वाईटावर विजय अशा या सणाचे ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत. (Holi 2024 Dont accidentally wear this color during Holika Dahan rules Otherwise negative energy)

होलिका दहनाच्या दिवशी या रंगाचे कपडे परिधान करु नका!

होलिका दहनाचा हा दिवश सकारात्मकाचा दिवस मानला जातो. यादिवशी होलिका दहनाच्या भस्मातून तुम्ही वाईट शक्तींचा नाश करु शकता. असं म्हणतात की होलिका दहनाच्या दिवशी वाईट शक्तीचा वावर असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या वेळी काही नियम सांगण्यात आले आहे. होलिका दहनाच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंगाचे कपडे परिधान करु नयेत. असं म्हणतात तुम्ही जर काळा रंगाचे कपडे परिधान केले असतील तर होलिका दहनात नकारात्मक ऊर्जा भस्म न होता ते आपल्या काळा रंगाकडे आकर्षित होता. ही नकारात्मक ऊर्जा आपल्या काळा कपड्यामुळे आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं म्हणतात.

तर महिलांनी ‘हा’ नियम लक्षात ठेवाव!

असं मानलं जातं की होलिका दहनच्या रात्री अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वावर असतात. त्यामुळे महिलांनी असो किंवा पुरुषांनी होलिका दहनाच्या जवळ जाताना डोके झाकावे. तर होलिका दहनाच्या दिवशी महिलांनी चुकूनही केस मोकळे ठेवू नयेत. 

असा करा भस्माचा वापर!

नजर दोष म्हणजे वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे म्हणून होलिका दहनानंतरची राख किंवा भस्म कपाळाला किंवा मानेला लावा. त्याशिवाय तुमच्या घराची किंवा एखाद्या व्यक्तीवरुन वाईट नजर काढून टाकण्यासाठी नारळ फिरवून ते होलिका दहनाच अपर्ण करा. 

होळी दहनाची वेळ (Holika Dahan Shubh Muhurat 2024)

होलिका दहन 24 मार्च 2024 चा शुभ मुहूर्त पंचागानुसार रात्री 11.13 ते 12.07 वाजेपर्यंत आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts