ipl 2024 rcb vs pbks fan who touched virat kohli feet beaten badly scary video leaked

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात 25 मार्च रोजी अटीतटीचा सामना पार पडला.  आरसीबीनं या सामन्यात पंजाबवर चार विकेटनं विजय मिळवला. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक यांनी शानदार कामगिरी केली. विराट कोहलीनं 49 बॉलमध्ये  77 धावा केल्या होत्या. मात्र, यामॅचमध्ये आयपीएलच्या सुरक्षा व्यवस्थेवर (IPl Security Breach) प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली. एक चाहता सुरक्षा व्यवस्था तोडून थेट मैदानात घुसला होता. त्यानं विराट कोहलीच्या पाया पडत, गळाभेटही घेतली होती. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण यामध्ये आज नवीन माहिती आणि व्हिडीओ समोर आला आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून मैदानात जाणाऱ्या विराट कोहलीच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी चोप चोप चोपल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सुरक्षारक्षकांनी एखाद्याला मारणं कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

विराट कोहलीच्या चाहत्याला चोप चोप चोपलं – 

पंजाब आणि आरसीबीच्या सामन्यादरम्यान एका चाहत्याने सुरक्षा व्यावस्था भेदून थेट मैदानात घुसला. चाहत्याने विराटचं पाय धरलं. त्यानंतर त्याची गळाभेटही घेतली. पण यामुळे त्याला चोप बसला आहे. स्टेडियमच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्याला मैदानातून बाहेर नेलं. त्यानंतर त्याला चार ते पाच जणांनी मिळून मारले. लाथा बक्क्यांनी मारल्या.. त्यानंतर गळाही पकडला. त्याला बेदम चोप दिला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याचं समजतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोकांनी सुरक्षाअधिकाऱ्यांर कठोर शब्दात टीका केली. त्याशिवाय त्यांना असा करण्याचा अधिकार आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे. 


आरसीबीचा पहिला विजय – 

चेपॉकवर आरसीबीला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर घरच्या मैदानावर 25 मार्च रोजी आरसीबीने विजयाचं खातं उघडलं. आरसीबीने पंजाबचा सहज पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी कराताना 176 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल आरसीबीने हे आव्हान सहज पार केले. आरसीबीकडून विराट कोहलीने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी फिनिशिंग टच दिला. आरसीबीने दोन सामन्यात एका विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts