Vijay Shivtare Vs Ajit Pawar dispute settled Vijay Shivtare said that Prime Minister Narendra Modi should be elected In Lok Sabha Elections marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) मी माघार घेत असल्याची घोषणा विजय शिवतारेंकडून  (Vijay Shivtare) करण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध विजय शिवतारे वादाला अखेर पूर्णविराम मिळाले आहेत. पण अगदी टोकाला पोहचलेल्या शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांच्या आवाहनानंतर देखील माघार न घेण्याचं पण केल्यावर आता माघार कशी घेतली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. याचं उत्तर देखील स्वतः शिवतारे यांनी दिलं आहे. 

माझं आयुष्य किती आहे हे मला माहित नाही. मी अनेक आजारांनी त्रस्त आहे. हे लक्षात घेता, जनतेचं हित मी जोपासायचं ठरवलं आहे. निवडणूक न लढता आपल्या मागण्या मान्य होत आहेत. दीड लाखांचं लीड पुरंदर तालुक्यातील महायुतीला द्यायचं, आमचं ठरलं आहे. अजित पवारांच्या हाताने काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय, असे स्पष्टीकरण शिवतारे यांनी दिला आहे. 

मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो : शिवतारे

मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो, 5 लाख 80 हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला होता. ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन ही आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत. त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. 15 ते 20 लोकसभा उमेदवार पडू शकतात. असं मला सांगण्यात आलं. यामुळं महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यामुळे आपण माघार घेत असल्याचे शिवतारे म्हणाले आहेत. 

‘ते’ साडेपाच लाख अजित दादांना मिळतील : शिवतारे

साडेपाच लाख मतं पवार विरोधी आहेत, पण यातील एक पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत. एक पवार आमच्याकडे आहेत, त्यामुळं ही साडेपाच लाख अजित दादांना मिळतील. आम्ही त्यांना समजावून सांगू, आमचे वरिष्ठ नेते त्यांना सांगितलंच. त्यामुळे आता बारामती लोकसभेचा सात-बारा अजित पवारांच्या नावावर होणार, असे शिवतारे यांचे संकेत म्हणावे मागतील. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

एकनाथ शिंदेंसाठी पुरंदरचा तह करतोय,नियतीने दिलेली असाईनमेंट बाजूला ठेवत बारामतीमधून विजय शिवतारेंची माघार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts