Pune Crime News Maharashtra Pune Dhankawadi Two Brothers Were Attacked By Pune Koyta Gang

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News : पुण्यात मागील काही दिवसांपासून  (Pune Crime News)  हाणामारी आणि हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच किरकोळ कारवणावरुन होणाऱ्या घटनादेखील वाढत आहेत. पुण्यात चहा पित असताना मस्करीतून झालेल्या वादातून दोघा भावांवर कोयत्याने वार करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (13 जून) रात्री 9:30 वाजता पुण्यातील धनकवडी भागात घडली.

4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून दोघांवर वार करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ऋषि बर्डे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ आदित्य राजेंद्र बर्डे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिद्धेश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं?

चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने वार केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. ऋषी आणि त्याचा भाऊ आदित्य हे भारती विद्यापीठ जवळ एका चहाच्या दुकानात त्यांच्या मित्रांसोबत चहा पित होते. यावेळी आदित्यने सिद्धेश चोरघे याची मस्करी केली. मात्र या मस्करीचे रूपांतर वादात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की सिद्धेश यांनी त्याच्या इतर साथीदारांना घेऊन आदित्य आणि ऋषी यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

कोयता गॅंगनं तोडला हात…

पुण्यात किरकोळ वादामुळे कोयत्याने केलेल्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी पूर्ववैमनस्यातून पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन एकाचा हात तोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली होती. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलं आणि त्यासोबतच आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचं नाव होतं. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला होता.

शहरात कोयता गॅंगचा धुमाकूळ

काही दिवसांपूर्वी पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर तरुणांनी राडा घातला होता. पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली होती. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. हॉटेलच्या मालकाशी वाद घातला होता आणि त्यानंतर मालकावर हल्ला केला होता. थरारक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. 

[ad_2]

Related posts