vanchit bahujan aghadi vba MIM dispute Prakash Ambedkar clear all doubts loksabha election 2024 maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने एमआयएम (MIM) साठीचे दार कायमस्वरूपी बंद केले आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यामागील कारण म्हणजे या बाबत स्वत: वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट वक्तव्य करत याबाबत माहिती दिली आहे. आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना एबीपी माझाने याबाबत प्रश्न विचारला असता, एमआयएमला आम्ही पूर्णपणे नाकारले असल्याचे वक्तव्य आंबेडकरांनी केले आहे.

एमआयएमचा प्रस्ताव तुम्ही पुन्हा धुडकावून लावला आहे, त्यामागील नेमकं कारण काय? असा प्रश्न विचारला असता, तेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मी त्या मागील कारण देऊ शकत नाही. मात्र, पक्षाचा निर्णय होता की आपण यापुढे एमआयएम सोबत जाऊ नये.  तोच निर्णय मी तुम्हाला कम्युनिकेट केला असल्याचे उत्तर त्यांनी दिलंय. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसाठीचे दार नेहमीसाठी बंद केल्याचे शक्यता जवळ जवळ निश्चित झाली आहे.  

खिचडीत जाऊन आम्ही काय करणार?

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत का गेली नाही, याचा खुलासा करत स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी प्रकाश  आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी मधील पक्षाचे भांडण संपत नसल्यामुळे आम्ही त्या खिचडीत जाऊन काय करणार? असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण महाविकास आघाडी सोबत जाणार नसलो तरी काँग्रेससोबत सात लोकसभा मतदारसंघात त्यांना आम्ही सहकार्य करू शकतो. याबाबतचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्राच्या माध्यमातून दिल्याची माहिती ही प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.  

त्या सात जागा कोणत्या याबद्दल विचारल्यावर काँग्रेसने अद्याप कोल्हापूर आणि नागपूर अशा दोन ठिकाणी सहकार्य मागितले आहे. त्यानुसार तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. उर्वरित पाच जागा संदर्भात आमची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने मतदारसंघ सांगावे. अन्यथा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देणे आम्हाला शक्य होणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

…. तर आम्ही तिथे जिंकलो असतो

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून पाच जागा दिल्या जाऊ शकतात. ते पाच मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीने सांगावेत, असा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावावर प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी त्याबाबत भाष्य करण्याचे टाळले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राऊतांच्या त्या प्रस्तावासंदर्भात फार गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मागच्या वेळेला आठ जागांवर काँग्रेस आणि एनसीपीमुळे वंचितचा पराभव झाला होता.

वंचितमुळे काँग्रेस आणि एनसीपीला अनुसूचित जातीची मत मिळाली. मात्र काँग्रेस आणि एनसीपीने आमची मुस्लिम मतही ब्लॉक केली. जर ती मुस्लिम मत आम्हाला मिळाली असती तर आम्ही तिथे जिंकलो असतो, असा दावाही  प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. अकोल्यामध्ये यापूर्वी नेहमीच काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिलाय. मात्र आता मुस्लिम समाजाने त्यांचा निर्णय घेतला आहे आणि तो काँग्रेसलाही कळवला असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts