Pune Crime Wife Killed Husband With Help Of Minor Girl S Boyfriend After Watching Crime Web Series 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime: पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जॅाय लोबो असं मृताच नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. 

मुलीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केला आहे. पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी 230 सीसीटीव्ही तपासत पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबो हे पतीपत्नी असून 17 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक अल्पवयीन मुलगी आहे. या मुलीचे ॲग्नैल कसबे नावाच्या मुलांसोबत प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर जॅाय लोबो याने पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. त्यावरून जॅाय लोबो याचा तिघांनी मिळून घरात चाकूने खून केला आणि एक दिवस घरातच मृतदेह ठेऊन दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. 

क्राईम वेब सीरिज पाहून केला खून

आरोपी सॅन्ड्रा लोबो आणि मयत जॉन्सन लोबो यांच्यातही सॅंड्रा हिचे बाहेर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वाद होत होते. त्यावरुन जॉन्सन तिच्या पत्नीला वारंवार मारहाण करायचा. तसेच मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल त्याला कळाल्यावर त्यांने त्याची पत्नी आणि मुलीला मारहाण केली होती. त्यामुळे सततच्या मारहाणीला कंटाळून आई आणि मुलीने जॉन्सन लोबोला संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे जॅायचा खून करण्याआधी पत्नीने आणि मुलीने वेगवेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि खून केला. पोलिसांना जळालेल्या मृतदेहाचा तपास केल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी पत्नी ही पतीचा खून केल्यावर ही नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून रोज त्याच्या फोनवरून स्टेटस अपडेट करत होती.

अल्पवयीन मुलीच प्रेमप्रकरण यशस्वी करण्यासाठी आईनेच मुलीच्या बापाचा खून करण्याची घटना विरळीच आहे. आता मात्र या प्रकरणाचा शेवट तुरुंगात होणार असून पतीची हत्या केल्याबद्दल पत्नीला शिक्षा होणार हे नक्की.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts