Rohit Pawar vs Tanaji Sawan 650 S crores scam in health department Rohit Pawar demanded for Tanaji Sawant resign

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी(Rohit Pawar) केला. तर अॅंब्यूलन्स खरेदीत  539 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असे म्हणत त्यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी केली पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी जिवंत खेकडा दाखवला हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचा प्रतीक असल्याचं रोहित पवार म्हणाले.  रोहित पवारांनी केला आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार  आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला याला आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही फाईल पुढे पास कशी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते. त्यांमी दुर्लक्ष केलं का? साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे, असं ते म्हणाले. 

आरोग्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी!

539 कोटी रुपये अॅंब्यूलन्सच्या खरेदीच्या नावाखाली खात्याल आले. सुमीत फॅसिलिटी ही पिंपरी चिंचवडची कंपनी होती.  या कंपनीला अॅंब्यूलन्स चालविण्याचा अनुभव नव्हता.  मात्र तरीही मुख्यमंत्री दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत या सुमेत कंपनीचा करार करण्यात आला. मात्र त्यानंतर बी व्ही जी या कंपनीने हे कंत्राट त्यांना मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यानंतर बी व्ही जी चा देखील समावेश या कंत्राटात करण्यात आला, असंही ते म्हणाले.  त्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एका बाजुला बी व्ही जी बाबत अनेक तक्रारी आहेत,  अनेक राज्यांत बी व्ही जी ब्लॅक लिस्ट कंपनी आहे.  मात्र तरीही या कंपनीला कंत्राट देण्यात आले. स्पॅनिश कंपनी ब्लॅक लिस्ट आहे .सुमित कंपनीने या कंत्राटासाठीचे निकष ठरवले आणि त्यानंतर स्वतःच टेंडर भरले.  काही दिवसांनी बी व्ही जी ला सहभागी करून घेतले, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत. मी या मुद्द्यावर मी आरोग्य मंत्र्यांशी जाहीर चर्चा करायला तयार असल्याचं ते म्हणाले. शिवाय या भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरण्यात येणार आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Loksabha Condtituency : पुण्याचं मैदान मारण्यासाठी दोन्ही पैलवानांचं ‘प्लॅनिंग वर प्लॅनिंग’, एकमेकांच्या बालेकिल्याकडे लक्ष

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts