amravati lok sabha election 2024 bjp s mega plan for Mahayuti candidate Navneet Ranas victory in Amravati lok sabha constituency maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amravati Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आगामी निवडणुकांमध्ये चारशे जागा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे ‘अबकी बार 400 पार’चा नारा देत देशभरात भाजप (BJP) मोठ्या ताकदीने मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे. अशातच गेल्या काही दिवसापासून कायम चर्चेत आलेल्या महायुतीतील (Mahayuti) अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana)यांच्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखल्याचा दावा करण्यात आला आहे. अमरावतीची जागा ही सर्वात जास्त मतांनी निवडून आली पाहीजे यासाठी अमरावती भाजपने नवनीत राणासाठी मोठी रणनीती आखली आहे. 

नवनीत राणांच्या विजयासाठी भाजपचा मेगा प्लॅन

अमरावती भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात नुकतीच भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सोबतच भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या देखील हजर होत्या. यावेळी भाजप नेत्यांनी एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहिला नाही पाहीजे, यासाठी संकल्प केला आहे. सगळ्यांनी नवनीत राणा यांच्या विजयासाठी 26 दिवस प्रचंड मेहनत करत दिवस-रात्र एक करायची आहे. तसंच 4 तारखेला नामांकन दाखल करताना जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक हजर राहतील याचं नियोजन यावेळी करण्यात आलंय.

भाजपची नेमकी रणनीती काय?

एकीकडे राज्यातील बहुचर्चित अशा अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुती मधील डोकेदुखी काही केल्या कमी होतांना दिसत नसतांना खासदार नवनीत राणांच्या प्रचारासाठी भाजप मैदानात उतल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसापासून महायुती मधील घटक पक्ष असलेल्या प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वादामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. भाजपने नुकतेच अमरावतीमधून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्यावतीने दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानातून रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. 

तसेच, याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) अगोदरच उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीची लोकसभा मतदारसंघाची (Amravati Loksabha) लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याने अमरावती लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शनिवारी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.

तर, दुसरीकडे स्थानिकांचा देखील नवनीत राणांना विरोध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अमरावतीच्या मैदानात भाजपला विजय संपादन करणे काही अंशी जिकरीचे जाणार आहे. याच अनुषंगाने भाजपने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी या मतदारसंघात अमरावतीकर नेमकी कोणाला साथ देणार, हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts